जैनांनीच एकदा जैनीजमच्या उगमाचा इतिहास वाचावा - सचिन संघवी - Rayat Samachar

जैनांनीच एकदा जैनीजमच्या उगमाचा इतिहास वाचावा – सचिन संघवी

रयत समाचार वृत्तसेवा

धर्मवार्ता

१६.६.२०२४

  • जैनांनीच एकदा जैनीजमच्या उगमाचा इतिहास वाचावा. वैदिकांच्या रूढीपरंपरांना, चातुर्वण्य, भेदभावांना, कर्मकांडांना कंटाळून, त्यांच्या कायम आपल्या छाताड्यावर बसून राहणे याला कंटाळून. त्यांच्या विरोधात सर्वात आधी विद्रोह करत वेगळ्या धर्माची म्हणजे जैनिजमची म्हणजेच जैन धर्माची स्थापना केली होती.
    आपल्या धर्माला आपल्या, तीर्थांकरांना त्याकाळी सर्व बहुजन ‘समाजसुधारक’ म्हणून ओळखत होते. भगवान महावीरांना आजही पुरोगामी आणि सुधारणावादी लोक सर्वात आद्यविद्रोही समाजसुधारक म्हणून स्थान देतात.
    आपल्या रूढी परंपरा, शिकवण जरूर आमलात आणा, पण आपण एकेकाळी क्षत्रिय व बहुजनवादीही होतो. वैदिकलोक पूर्वी जैन होण्यापूर्वीचे क्षत्रिय लोकांना दबून होते. कारण त्यांच्या हातात तलवार होती व ते लढवय्ये होते. जैन संतांना यासाठी दबकून राहत होते, कारण बहुजन समाजात त्यांच्या विचारांना ऐकले जात होते. त्यामुळे त्यानंतर शंकराचार्यांनी आपल्या जैन संतांच्या केलेल्या हत्यांचा इतिहास वाचा.
    आपण कोणत्याही अँगलने हिंदू किंवा वैदिक धर्मीय नाही आहोत !
    जरा स्वतःच्या श्रेष्ठ समजण्याच्या कुंपणाबाहेर निघा. आपण पुढारलेली जमात आहोत. वैदिकधर्म हा पुन्हा मध्ययुगात घेऊन जाणारा धर्म आहे. जिथे राग, लोभ, द्वेष, मत्सर शिकवला जातो. आपण त्याला लाथ मारून जैन झालो आहोत.
    – सचिन संघवी,
    धुळे, खानदेश,
    महाराष्ट्र

लेखक - सचिन संघवी

Share This Article
Leave a comment