cultural: मकरसंक्रांतीसाठी सजली बाजारपेठ; सर्वाधिक 600 रुपयांच्या पतंगाने केले ग्राहकांना आकर्षित - Rayat Samachar
Ad image

cultural: मकरसंक्रांतीसाठी सजली बाजारपेठ; सर्वाधिक 600 रुपयांच्या पतंगाने केले ग्राहकांना आकर्षित

उपसंपादक | दिपक शिरसाठ

अहमदनगर | १३ डिसेंबर | पंकज गुंदेचा

(cultural) मकरसंक्रांत हा महिला व मुलांचा आनंदाचा सण असल्याने या सणाला खुप महत्व आहे. १४ तालुक्यांचा मोठा जिल्हा असल्याने अहमदनगर येथील बाजारपेठ महत्वाची आहे. त्यामुळे जिल्ह्यात मकरसंक्रांतीचे आगळे-वेगळे महत्व आहे. तालुक्यातील माणूस शहरात सणाच्या खरेदीसाठी येत असतो. येथील तिळगुळ व तिळाच्या रेवड्या राज्यभर प्रसिद्ध आहेत. तसेच सुवासीनींसाठी मकरसंक्रांतीच्या पूजेचे साहित्य आणि वाटण्यासाठी वाण याची मोठ-मोठी दुकाने आहेत. पतंगप्रेमींसाठी साधा मांजा व आकर्षक पतंग बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

(cultural) शहरातल्या झेंडीगेट येथे सर्वात जूने कन्हैया पतंग सेंटर हे दुकान प्रसिद्ध आहे. येथे वर्षभर पतंग बनविण्याचे काम सुरू असते. परंतु, आजच्या आधुनिक युगात पंधरा दिवसांत पतंग बनवून आकर्षक पद्धतीने दुकाने थाटुन ग्राहकांना आकर्षित केले जाते.

cultural
बागडपट्टी येथील आकर्षक सजावट केलेले श्रीकांत येणगुपटला यांचे दुकान ( छाया : पंकज गुंदेचा )

शहरातील बागडपट्टी येथे पतंगाची नव्याने सुरू झालेली दुसरी मोठी बाजारपेठ आहे. तेथे रिटेल व होलसेल दोन्ही प्रकारे पतंगविक्रीसाठी उपलब्ध आहेत. येथील श्रीकांत येनगुपटला यांच्या जय शंकर पतंग सेंटर या दुकानात अहमदाबादी, सुरती, बॉम्बे, गोंडा अशा विविध प्रकारचे पतंग उपलब्ध आहेत. त्याची किंमत १० रु. पासून ते ७० रु पर्यन्त आहे तर कापडी पतंग २५० रु. पासून ते ६०० रु. पर्यन्त तर न्यू इंडिया, बरेली, कॉटन, रेडपांडा, वर्धमान असे सर्वे प्रकारचा मांजा विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

विशेष म्हणजे येनगुपटला यांनी दुकानाच्या दर्शनी भागात ‘चायना मांजा वापरण्यास बंदी आहे’ असा प्रबोधनपर संदेश देखील दिला आहे .

हे हि वाचा :  श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
Share This Article
Leave a comment