राज की बात | १३ जानेवारी | विनायक देशमुख
(india news) “श्रद्धा आणि सबुरी” चा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या पावनभूमीत भारतीय जनता पक्षाचे राज्यातील आतापर्यंतचे सर्वात मोठे अधिवेशन यशस्वीपणे संपन्न झाले. या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातून आलेले मंत्री, आमदार, खासदार, पक्षाचे तालुकास्तरापासून प्रदेशस्तरापर्यंतचे पदाधिकारी यांनी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. व मा. खा. डॉ. सुजय विखे पा. यांच्या संघटन कौशल्याची चुणुक अनुभवली. राज्यातून आलेले १५ हजारपेक्षा जास्त प्रतिनिधी शिर्डी येथील चोख व्यवस्थेमुळे अत्यंत ‘प्रभावीत’ झाल्याचे पदोपदी जाणवत होते.
(india news) भाजपाच्या राज्य संघटनेशी समन्वय ठेवुन आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन मा.खा.डॉ. सुजय विखे पा. यांनी अधिवेशनाच्या नियोजनाची जबाबदारी कुशलतेने लिलया यशस्वी केली.
(india news) या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व नारायणराव राणे, केंद्रातील व राज्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि १५ हजारपेक्षा जास्त प्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे सर्वांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, श्रीसाईबाबांच्या समाधीची दर्शन व्यवस्था, हे एक प्रचंड नियोजन होते. मात्र या नियोजनाची सुरुवात आधीपासूनच करण्यात आली होती.
भाजपाचे प्रदेश पदाधिकारी आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजनाची पहिली बैठक शिर्डी येथे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपन्न झाली. त्यावेळी विविध नियोजनासाठी १५ पेक्षा जास्त विषय समित्या स्थापन करण्यात आल्या. आणि मा.खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या समित्यांनी अत्यंत ‘सूक्ष्म’पणे व धडाडीने कामाला सुरुवात केली.
(india news) सर्व प्रतिनिधींच्या आगमनापासून ते गमनापर्यंत, स्वागत कक्ष, वाहन व्यवस्था, अल्पोपहार व्यवस्था, भोजन व्यवस्था, श्री साईबाबा समाधी दर्शन व्यवस्था, व्यासपीठ व्यवस्था, बैठक व्यवस्था याशिवाय मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्या समवेत होणाऱ्या आमदार, खासदार, मंत्री, जिल्हाध्यक्ष प्रदेश पदाधिकारी यांच्या बैठका, विविध नेत्यांच्या पत्रकार परिषदा यासंबंधीची व्यवस्था, अशा विविधस्तरावर उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. व मा.खा. डॉ. सुजय विखे पाटील हे प्रत्येक व्यवस्थेवर जाणीवपूर्वक स्वतः लक्ष देत होते. आलेल्या प्रत्येक प्रतिनिधीचा, मग तो तालुक्याचा प्रतिनिधी असो किंवा केंद्रीय मंत्री असो, सर्वांचा उचित सन्मान व आदर राखला जाईल, याकडे विखे पिता-पुत्रांचा विशेष ‘कटाक्ष’ होता.
आतापर्यंत ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक भव्यदिव्य कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. मात्र हा कार्यक्रम म्हणजे पक्षाचे अधिवेशन, हे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व्हावे, सर्वांचा त्यामध्ये सहभाग असावा, आलेल्या प्रतिनिधींसाठी ‘आवश्यक त्या सर्व’ सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले. ना. राधाकृष्ण विखे पा. व मा.खा. डॉ. सुजय विखे पा. हे राष्ट्रपतींचा कार्यक्रम असो अथवा पंतप्रधानांच्या कार्यक्रम असो किंवा पक्षाचा लाखोंचा मेळावा असो, असे भव्य दिव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्राला परिचित आहेत.
ता. ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेले भाजपाचे आत्तापर्यंतचे ‘सर्वात मोठे’ राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वीपणे आयोजित करून विखे पिता-पुत्रांनी त्यांच्या संघटन कौशल्याच्या आणि ‘सूक्ष्म’ नियोजनाच्या लौकिकात मानाचा तुरा खोवला आहे.
हे ही पहा : छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांचे श्रध्दास्थान शाह शरीफ दर्गा