Politics: एकेकाळी स्वतःच्या स्टेजवर राजकीय मंडळींना नाकारणारे 'अण्णा' आज 'भ्रष्ट' राजकीय स्टेजवर का दिसत आहेत ? - Rayat Samachar
Ad image

politics: एकेकाळी स्वतःच्या स्टेजवर राजकीय मंडळींना नाकारणारे ‘अण्णा’ आज ‘भ्रष्ट’ राजकीय स्टेजवर का दिसत आहेत ?

रा.स्व.संघ भाजपाच्या प्रा.राम शिंदे सत्कार सोहळ्याचे प्रमुख भ्रष्टाचारविरोधी 'गांधीवादी' अण्णा हजारे

उपसंपादक | दिपक शिरसाठ

बरीच मोठी यादी असलेली मंडळी भाजपमधे आहेत. अशा भ्रष्ट मंडळीसोबत अण्णा कसे?

अहमदनगर | ६ जानेवारी | ग्यानबाची मेख

(politics) महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या सभापतीपदी रा.स्व.संघ भाजपाचे राम शिंदे यांची १९ डिसेंबर रोजी निवड झाली. शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार समारंभ माऊली सभागृहात शनिवार पार पडला. सोहळ्यासाठी ‘भ्रष्टाचार’विरोधी आंदोलनाचे सर्वेसर्वा कि.बा. तथा अण्णा हजारे कार्यक्रमाचा अध्यक्ष होते.

 

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

(politics) अण्णा हजारे यांची ओळख गांधीवादी म्हणून आहे. ते भारतातील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. २०११ मध्ये हजारे यांनी लोकपाल विधेयक म्हणून ओळखला जाणारा मजबूत भ्रष्टाचारविरोधी कायदा मंजूर करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले. तेव्हा आंदोलनाला भ्रष्टाचाराने त्रस्त झालेल्या लोकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. ही चळवळ ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ म्हणून ओळखली जाऊ लागली. सरकारी आणि व्यावसायिक क्षेत्रातील व्यापक भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या देशभरातील ‘सज्जन’ लोकांचा पाठिंबा मिळाला. हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने भ्रष्टाचाराच्या मुद्द्याबद्दल जागरुकता निर्माण केला आणि सुधारणांना पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

आंदोलनाने या मुद्द्यावर कारवाई करण्यासाठी सरकारवर प्रचंड दबाव आणला. त्यावेळी केंद्रात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच सरकार होते. हे सरकार पाडण्यासाठी अण्णांचे आंदोलन कारणीभूत ठरले, त्यानंतर रा.स्व.संघाचे भाजपाई सत्तेत आले.

आता अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील जाणत्या लोकांसह सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, अण्णा हे स्वतःला ‘गांधीवादी’ म्हणतात आणि खुद्द राष्ट्रपिता महात्मा गांधींना नाकारणाऱ्या रा.स्व.संघ भाजपच्या मंचावर ‘प्रमुख’ कसे असू शकतात?

एकेकाळी अण्णांची भूमिका होती की, त्यांच्या आंदोलनाच्या स्टेजवर कुणाही राजकीय नेत्याला जागा नाही. आता ही भूमिका बदलली का ? त्यावेळी ‘भ्रष्टाचारी’ काँग्रेसमधे असणारे बरेच नेते आज भाजपमधे स्थिरस्थावर आहेत. त्यांना आता ईडी-सीबीआयची भीती वाटत नाही, ते आता निवांत झोपू शकतात. यामधे महाराष्ट्रातील मुंबईत गाजलेल्या ‘आदर्श’ घोटाळ्यातील अशोक चव्हाण त्यांच्या अनुयायांसह आज भाजपमधे आहेत. सिंचन घोटाळ्यात नाव आलेले अजित पवार उपमुख्यमंत्री सोबत आहेत.politics अहमदनगर जिल्ह्यासह राज्यभर गाजलेल्या २९१ कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेच्या ‘अर्बन बँक घोटाळा’ मधील काही आरोपी ‘भ्रष्टाचारविरोधी’ अण्णा उपस्थित असलेल्या स्टेजवर होते. मुळात ‘अर्बन बँक घोटाळ्याचे मुख्य प्रवर्तक हे रा.स्व.संघ भाजपाचे होते. या घोटाळ्यातील अनेक फरार आरोपी याच पक्ष व त्याच्या मातृसंघटनेशी संबंधित आहेत. तसेच अहमदनगर महानगरपालिकेतील ३२ कोटी रूपयांच्या ‘म्हसणवाटा घोटाळा’ मधील काही माजी नगरसेवक, पदाधिकारी हे अण्णा हजारे प्रमुख असलेल्या या राजकीय कार्यक्रमाच्या शहरभर लावलेल्या फ्लेक्सवर झळकत होते. तसेच सातारा जिल्ह्यातील ‘शरयू’ या शेतकरी कंपनीस गंडा घालणारे इसमही या स्टेजवर मिरवत होते. अशी बरीच मोठी यादी असलेली मंडळी भाजपमधे आहेत. अशी अनेक भ्रष्ट मंडळीसोबत अण्णा कसे ? हा प्रश्न जिल्हाभरातील जाणते लोक विचारत आहेत.

बीबीसी मराठीच्या मुलाखतीत एका प्रश्नावर अण्णांचे असे उत्तर होते. २०११ मध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून देश जागा झाला कारण त्यावेळी भ्रष्टाचार खूपच वाढलेला होता. महागाईचाही प्रश्न होता. हे सगळे लोकांच्या मनातले मुद्दे होते म्हणून सगळे रस्त्यावर उतरले. जनता रस्त्यावर आली त्यामुळे सरकारला लोकपाल विधेयक आणावे लागले. १९६६ पासून या देशात जे झाले नव्हते ते झाले. यानंतर नवे सरकार आल्यावर हे सरकार तरी याची अंमलबजावणी करेल असे वाटले होते. पण या सरकारने हा कायदा कमजोर करणारे नवे विधेयक आणले. याला माझा विरोध आहे.

आपला देश कृषीप्रधान आहे, असे आपण म्हणतो. पण याच देशात शेतकरी आत्महत्या करतोय. सरकारला शेतकऱ्यांपेक्षा उद्योगपतींची चिंता आहे. देशातले उद्योगपती घबाड घेऊन देशाबाहेर पळून गेले तरी सरकार यावर काहीच करत नाही. अशा राज्यात जगायची माझी इच्छा नाही. आम्ही म्हणतोय, शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतंत्र कृषीमूल्य आयोग नेमा, त्याला स्वायत्तता देऊन त्यावर अनुभवी शेतकऱ्यांची नेमणूक करा. शेतीमालावरचे सरकारचे नियंत्रणही हटले पाहिजे. हे सरकार आश्वासने खूप देते पण पाळत नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जगभर फिरत असतात पण त्यांना देशाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मी जे मुद्दे मांडतोय ते त्यांना महत्त्वाचे वाटत नाहीत. त्यांचे याकडे लक्ष वेधण्यासाठीच मी रामलीला मैदानावर उपोषण करणार आहे. मी हे आधीच स्पष्ट केले की, आमच्या आंदोलनाच्या स्टेजवर कुणाही राजकीय नेत्याला जागा नाही. अरविंद केजरीवाल यांनाही नाही. ज्यांना आंदोलनात सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी आंदोलकांमध्ये बसावे. जनतेसोबत बसावे. मी हे आंदोलन राजकीय कारणांसाठी नाही तर गाव, समाज आणि देशासाठी करतो आहे. मी गेली ३५ वर्षे आंदोलन करतोय. एक सरकार गेलं की दुसरं येतं पण प्रश्न तसेच आहेत.

अण्णाच्या भूमिकांवर लोकांना आता प्रश्न पडला आहे की, हे नेमके कोणासाठी काम करत आहेत. एकेकाळी स्वतःच्या स्टेजवर राजकीय मंडळींना नाकारणारे आण्णा हजारे आज ‘भ्रष्ट’ राजकीय स्टेजवर का दिसत आहेत ?

हे हि वाचा : हाच लेख ई-पेपर रयत समाचारमधे वाचण्यासाठी येथे क्लिक करावे

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment