india news: 83 वर्षाच्या बँकेचे 'यूको सहकारी' तत्पर सेवेसाठी सदैव तयार - उपेश कुमार मिना - Rayat Samachar

india news: 83 वर्षाच्या बँकेचे ‘यूको सहकारी’ तत्पर सेवेसाठी सदैव तयार – उपेश कुमार मिना

वर्धापन दिनानिमित्त ग्राहक मेळावा संपन्न

रयत समाचार वृत्तसेवा
उपसंपादक | दिपक शिरसाठ

‘लाडकी बँक’ झाली ८३ वर्षाची

अहमदनगर | ७ जानेवारी | पंकज गुंदेचा

(india news) शहरातील चितळेरोडवरील अहमदनगर शाखा असलेल्या यूको बँकेच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी ता.६ जानेवारी रोजी ग्राहक मेळावा संपन्न झाला. प्रमुख शाखाधिकारी उपेश कुमार मिना यांनी ग्राहकांचे स्वागत करून संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आपली सर्वांची ‘लाडकी बँक’ ८३ वर्षाची झाली. आतापर्यंतचा टप्पा ग्राहकांच्या विश्वासावरच पार पाडलेला आहे. त्यास जोड म्हणजे सर्व कर्मचारी यांची तत्पर सेवा. ग्राहकांच्या कोणत्याही अडचणीवर आपले कर्मचारी तात्काळ तोडगा काढतात.india news

(india news) ते पुढे म्हणाले, ग्राहक समाधानी असेल तर बँक नक्कीच पुढे जाते हे उदाहरण म्हणजे यूको बँक. आपल्याकडे अनेक प्रकारच्या बँकींग सुविधा उपलब्ध असून ज्यांना कोणाला गृहकर्ज, वाहनकर्ज तसेच शेतकरी बांधवांसाठी शेतीवरील सोनेतारण कर्ज उपलब्ध असल्याची माहिती दिली.

   बँकेचा वर्धापनदिन केक कापून साजरा करण्यात आला. अनेक ग्राहकांनी आपले मनोगत व्यक्त केले. बँकेचा अनेक वर्षांपासून ऋणानुबंध असलेले ज्येष्ठ नागरिक, महिला, निवृत्त कर्मचारी यांनी कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.india news

यावेळी सहा. शाखाधिकारी बरून कुमार, सहा. कृषी अधिकारी अमित ठाकर, कोठारे, सोनटक्के, वसंतमामा जाधव, पांडूमामा, आप्पा तथा रमाकांत कुलकर्णी, महानगरपालिका स्थायी समिती माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी, सोमनाथ खाडे, बोठे साहेब, योगेश कुलथे, देशपांडे, गोयल, दिनेश कुर्टन, संजय राठोर आदी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
india news

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

 

Read This: Womens Power: The Story of an Accomplished Woman: Vanita Vishwa – Dr. Sulabha Janjire Pawar
The Entire Sky of Women

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
Share This Article
Leave a comment