Books Donation: 250 पुस्तकांच्या भेटीतून वाचनालयाच्या ग्रंथसंपदेत मोलाची भर; अमृत गांधी यांचा पुढाकार

Books Donation: २५० पुस्तकांच्या भेटीतून सद्गुरु श्री साहेबराव आवारे वाचनालयाच्या ग्रंथसंपदेत मोलाची भर; अमृत गांधी यांचा पुढाकार

rayatsamachar
2 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

नगर तालुका | २५.११ | पंकज गुंदेचा

Books Donation: ग्रामीण भागात वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा, विद्यार्थ्यांसह युवकांना ज्ञानाची नवी दालने खुली व्हावीत आणि समाजात वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने विद्युत अधीक्षक अभियंता अमृत गांधी यांनी सद्गुरु श्री साहेबराव आवारे प्रतिष्ठान संचलित ‘सद्गुरु श्री साहेबराव आवारे वाचनालयास’ २५० पुस्तके भेट दिली.

ग्रंथ हे माणसाचे खरे मित्र असून पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञान, विचार आणि संस्कारांची समृद्धी होते. आजच्या डिजिटल युगातही वाचनाचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी अमृत गांधी यांनी केलेली ही पुस्तक भेट निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या योगदानामुळे वाचनालयाच्या ग्रंथसंपदेत मोलाची भर पडली असून परिसरातील विद्यार्थी, युवक आणि वाचकांना याचा लाभ होणार आहे.

Books Donation

- Advertisement -

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ मगर म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य वाचकांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध व्हावीत, वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि ज्ञानाची व्याप्ती वाढावी, या उद्देशाने प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाचनालय सुरू करण्यात आले आहे. अमृत गांधी यांनी २५० पुस्तके भेट देऊन या ज्ञानचळवळीला मोलाचे सहकार्य केले आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनीही अशा उपक्रमांना सहकार्य करून वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी पुढाकार घ्यावा.

सद्गुरु श्री साहेबराव आवारे प्रतिष्ठानच्या वतीने अमृत गांधी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

हे हि वाचा :   सावित्रीबाईंच्या शैक्षणिक वारशाची शाळा वाचवा! सिंथिया फॅरार ते क्लेरा ब्रुस : अहिल्यानगरच्या ऐतिहासिक मुलींच्या शाळेचे भवितव्य काय? ऐतिहासिक शाळेला ‘आदर्श मॉडेल स्कूल’ चा दर्जा द्या


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading