Ahilyanagar News: साखर कामगाराच्या त्रिपक्षीय समितीवर डी एम निमसे यांची निवड

मुळा उद्योग समूहाच्या वतीने सन्मान

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read

सोनई |२४ डिसेंबर| विजय खंडागळे

Ahilyanagar News महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यातील व जोडधंदेतील कामगाराच्या वेतन वाढीसह इतर मागण्याबाबत विचार करण्यासाठी साखर कारखाना मालक प्रतिनिधी, साखर कामगार प्रतिनिधी व शासन प्रतिनिधी अशी त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीत मुळा कारखाना राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे सरचिटणीस डी. एम. निमसे यांची निवड झाल्याबद्दल मुळा कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांचे शुभहस्ते कारखान्याच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. साखर कामगाराच्या प्रश्नावर साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व साखर कामगार महासंघ या राज्यव्यापी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दालनामध्ये त्रिपक्षीय समिती बाबत सविस्तर चर्चा झाली.

समितीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सहचिटणीस आनंदराव वायकर, प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे, महासंघाचे कार्याध्यक्ष शिवाजी औटी, साखर कामगार फेडरेशन चे अविनाश आदिक यांची निवड झाली आहे.

मुळा कारखाना कार्यस्थळावर आज झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर शंकरराव दरंदले  ,सेक्रेटरी रितेश टेमक,  एच आर भोर, बारगळ,  कार्यालयीन अधीक्षक योगेश घावटे, युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार उपाध्यक्ष कारभारी लोडे, खजिनदार सुभाष सोनवणे ,सह सेक्रेटरी भारत पटारे ,कामगार संचालक किशोर राजगुरू, विश्वास डेरे, परचेस ऑफिसर देशमुख, शेतकी अधिकारी विजय फाटके, उप शेतकी अधिकारी चावरे, डिस्टलरी मॅनेजर बाळासाहेब दरंदले ,वर्क्स मॅनेजर पवार , चीफ इंजिनिअर नवले, चीफ केमिस्ट देशमुख ,गाढे,बी एस बानकर,रफिक पटेल , आदिनाथ शेटे, इलेक्ट्रिक इंजिनिअर पुगळे, भासार, गोवर्धन बेल्हेकर, संदीप इथापे, राजेंद्र शिंदे, विजय गोरे,गणगे साहेब, शांतीलाल सुपारे ,पोपट कंक, सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

हे हि वाचा : नैतिकता : समाजांतर्गत सुरक्षित जीवन जगण्यासाठी आवश्यक – संजय सोनवणी


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading