Cultural Politics: आ.जगतापांच्या नथीतून 'महानगरपालिके'वर तीर; 'भयमुक्त नगर'वाल्यांचा प्रचार करण्याची रा.स्व.संघ भाजपावर नामुष्की; 'मन की बात' उघड ? - Rayat Samachar

Cultural Politics: आ.जगतापांच्या नथीतून ‘महानगरपालिके’वर तीर; ‘भयमुक्त नगर’वाल्यांचा प्रचार करण्याची रा.स्व.संघ भाजपावर नामुष्की; ‘मन की बात’ उघड ?

रयत समाचार वृत्तसेवा
75 / 100

ग्यानबाची मेख | ७ नोव्हेंबर | भैरवनाथ वाकळे

Cultural Politics  विधानसभा निवडणुकीविषयी परवा ता.५ नोव्हेंबर रोजी तुषार गार्डन, अहिल्यानगर भाजपाचा बैठकवजा मेळावा पार पडला. त्यात कार्यकर्त्यांना काही सुचना मांडायच्या का ? असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी केले परंतू निवडणूकीच्या रिंगणात ‘आपला‘ उमेदवार नसल्याने सुचना मांडून काय उपयोग ? असा बहुतेक सर्वच कार्यकर्त्यांनी विचार केला असावा. तीनचार कार्यकर्ते वगळता कुणीच सुचना मांडल्या नाहीत, त्याचे कारणही स्पष्ट दिसले, अशी माहिती सुत्रांकडून समजली.

  रा.स्व.संघ भाजपाच्या Cultural Politics  ‘मन की बात’ नक्की काय आहे हे शहरातील सामान्य लोकांनी, मतदारांनी समजून घेतले पाहिजे. तर ‘मन की बात’ अशी आहे. ‘आपला‘ उमेदवार नाही, आपल्याला बुथ प्रमुख, सुपर वॉरीयर, वॉरीयर, प्रभाग प्रमुख, मंडल प्रमुख या भुमिका कराव्या लागणार नाही कारण जे लोकसभेच्या निवडणूकीत काही अपेक्षेसह किंवा अपेक्षांसाठी कार्यकर्ता दिवसरात्र पळत होते, ती अपेक्षा पूर्ण होणार की नाही ? हा महत्वाचा मुद्दा आणि विशेष ‘उमेदवारच आपला नाही‘ मग प्रचारासाठी पळायचे कोणासाठी, कशासाठी ? तर तशी काहीही अपेक्षा न ठेवता आपला भाजपचे अस्तित्व शहरात टिकवायचे असेल तर फक्त आपले भाजपचेच (महायुती) स्वतंत्र पॉम्पलेट तयार करून शहरात प्रचार करावा. पुढे महापालिका डोळ्यासमोर ठेवून त्या निवडणुकीची पुर्व तयारी समजून आपले भाजपचे नगरसेवकपदाचे दावेदार यांचे तरी कामी येईल.

‘मन की बात’ मधे असेही म्हटले, अशा रितीने विधानसभेच्या उमेदवाराचा प्रचार भाजपचे (महायुती) स्वतंत्र पॉम्पलेट तयार करून प्रचारात उतरावे लागेल. ज्यांना खरोखरच महापालिकेत उमेदवारी करायची असेल त्यांनी तसे स्वखर्चाने केले तर महापालिका जड नाही. आता भाजपचा खासदार नाही. आमदार नाही. जरी आमदारांना मंत्रीपद मिळाले तरीही ते ‘आपले‘ नाहीत. ही भावना मनात ठेवून आपणच आपले भाजपचे अस्तीत्व तयार ठेवावे. या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी आर्थिक अपेक्षा न ठेवता काम करावे. त्यासाठी विधानसभा प्रमुख, जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस यांना आग्रह करू नये. कारण उमेदवार ‘आपला‘ भाजपचा नाही, पण भाजपचे शहरात अस्तीत्व टिकून ठेवण्याकरीता सर्वांना महाालिकेची नांदी म्हणून भाजपचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणले तर महापालिकेवर भाजपचा झेंडा आपल्याला दूर नाही. सर्वांनी ‘चालू’ निवडणूकीत उजळणी करून घ्यावी. जय श्रीराम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो.
ही झाली रा.स्व.संघ भाजपाची ‘मन की बात’ काही वर्षांपूर्वी भाजपा-सेना युतीने भोळ्या अहमदनगरकरांना कर्डीले-कोतकर-जगताप या त्रयींचा ‘बागुलबुवा’ दाखवत ‘भयमुक्त नगर’ची घोषणा दिली. त्यांच्या विरोधात मोठे रान उठविले. राज्य व देशपातळीवरील पुढारी आणून या त्रयींविरोधात ‘भयमुक्त नगर’ अहमदनगरकरांच्या गळी उतरविले. बुडविलेल्या नगर अर्बन बँकेत, महानगरपालिकेत व विधानसभेत सत्तालाभ घेतला. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले ‘भयमुक्त नगर’ झाले की नाही येणारा काळ ठरवणार आहे. परंतु ज्यांच्या विरोधात ‘भयमुक्त नगर’ घोषणा देवून सत्तालाभ घेतला, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ आज आली असल्याचे दिसून येत आहे.
कर्डीले-कोतकर-जगताप कसे आहेत यापेक्षा भोळ्याभाबड्या अहमदनगरकरांना ‘भोकाडी’ दाखवुन सत्ता मिळविणारे रा.स्व.संघ भाजपा सेना आज उघडे पडले आहेत. ही ‘मन की बात’ समजून घेतली तर असे लक्षात येते की, आ.जगतापांच्या नथीतून ‘महानगरपालिके‘वर तीर मारण्याची मोहिम जोरात सुरू होणार आहे. त्यासाठी रा.स्व.संघ भाजपा प्रचारात उतरला आहे. अहिल्यानगरकरांना एवढे समजले तरी बास !Cultural Politics
कृपया, ‘ग्यानबाची मेख’ वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
Leave a comment