Health: महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे एकदिवसीय सेमिनार संपन्न; महाराष्ट्रातील शंभर अस्थिरोग तज्ञांचा सहभाग - Rayat Samachar

Health: महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे एकदिवसीय सेमिनार संपन्न; महाराष्ट्रातील शंभर अस्थिरोग तज्ञांचा सहभाग

रयत समाचार वृत्तसेवा
67 / 100

अहमदनगर | १५ ऑक्टोबर | समीर मनियार

Health अहिल्यानगर अस्थिरोग संघटना व महाराष्ट्र अस्थिरोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हात व मनगट यासंबंधीचे आजार व उपचार या विषयावर एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. सेमिनारमध्ये महाराष्ट्रातील शंभर अस्थिरोग तज्ञांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमांचे उद्घाटन संघटनेचे सचिव हाताचे सर्जन डॉ. अभिजीत वाहेगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी सर्जन डॉ. पंकज आहेर (मुंबई ) डॉ. अशोक घोडके, डॉ. किरण लडकत, डॉ. प्रशांत कांबळे, डॉ. वाहिद अल्ताफ, डॉ. अनुप बनसोडे, आयएमएचे अध्यक्ष चंद्रवदन मिश्रा, संघटनेचे सचिव अस्थिरोग तज्ञ राहुल पंडित, अध्यक्ष संतोष चेडे, सचिव अशितोष जोशी, माजी अध्यक्ष व्ही.एन. देशपांडेसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील येथील शंभर अस्थिरोग तज्ञ उपस्थित होते.

यावेळी मुंबईतील अस्थिरोग तज्ञ अशोक घोडके यांनी तळहाताच्या तुटलेल्या नसा, डॉ.पंकज अहिरे यांनी हातातील फॅक्चर, डॉ.अभिजीत वाहेगावकर यांनी हातातील व्यंग व त्यावरील उपचार पद्धती, डॉ. प्रशांत कांबळे यांनी मनगटाचे आजार व उपचार पद्धती यावर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. किरण लडकत, डॉ. अनुप बनसोडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

यावेळी महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे संचालक डॉ. राहुल पंडित म्हणाले, अशा सेमिनारचे वेळोवेळी आयोजन झाल्यास महाराष्ट्रातील अस्थिरोग तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनामुळे येथील डॉक्टरांना त्याचा फायदा होईल रुग्णांना पुणे मुंबई अशा बाहेर शहरात जाण्याची गरज भासणार नाही. त्या माध्यमातून महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यासाठी मणक्या संबंधीचे आजार दुर्बीण शस्त्रक्रिया व सांधे बदली शस्त्रक्रिया अशा अस्थिरोगासंबंधीचे चर्चासत्राचे आयोजन करण्याचा मानस संघटनेचा असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकात अध्यक्ष संतोष चेडे म्हणाले, नगर येथे अस्थिरोग संघटनेच्या वतीने एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यात महाराष्ट्रातील शंभर अस्थिरोग तज्ञांनी आपला सहभाग नोंदवला व येथील डॉक्टरांना मार्गदर्शन केले या सेमिनारचा निश्चितच येथील डॉक्टरांना फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.राहुल पंडित तर डॉ. अशूतोष जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
Share This Article
Leave a comment