शेवगाव | २२ सप्टेंबर | प्रतिनिधी
Press महाराष्ट्र राज्य फ्रीडम पॉवर पत्रकार संघाच्या शेवगाव तालुका उपाध्यक्षपदी नरहरी शहाणे यांची तर जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी राजेंद्र मराठे यांची नुकतिच निवड करण्यात आली. यावेळी तालुक्यातील इतर पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
यावेळी नरहरी शहाणे म्हणाले, आता पत्रकारीतेचा परिघ वाढलेला आहे. पुर्वी लिमिटेड पत्रकार होते, पण नवी पिढी अभ्यासू व सजग असल्याने अनेक माध्यमांमधून पत्रकार म्हणून तरूण पुढे येत आहेत. त्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यावर मात करण्यासाठी फ्रीडम पॉवर पत्रकार संघ राज्यभर कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न सोडविण्यात येतील. संघटन करत माझी जबाबदारी मी सक्षमपणे पार पाडणार आहे.
यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेंद्र मराठे म्हणाले, चांगले संघटन असेल तर सर्वसामान्यांचे प्रश्न तात्काळ सुटतात. त्यासाठी एकी महत्वाची आहे.
महाराष्ट्र राज्य फ्रीडम पॉवर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दिपक मेढे, अध्यक्ष बाजीराव खांदवे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह शेवगाव येथे नूतन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा