अहमदनगर | २५ ऑगस्ट | प्रतिनिधी
नाशिक येथील Art असोसिएट्सच्या वतीने शास्त्रीय नृत्याचा आविष्कार कार्यक्रम सोहळा शंकराचार्य न्यास येथे आयोजित करण्यात आला होता. लाँगेस्ट नॉनस्टॉप क्लासिकल डान्स रिले यामध्ये शरण्या आशिष वेळापुरे हिने सहभागी होऊन आपली कला सादर केली. तिने २८ पौराणिक कथेच्या माध्यमातून कथक, भरतनाट्यम, ओडिसी, कुचीपुडी, मोहिनहट्टम् आणि हत्रिय असे सहा प्रकार सादर केले. शास्त्रीय नृत्याचा आपल्या प्रगल्भ पौराणिक कथांच्या साठ्यातील काही मनमोहक कथा वेगवेगळ्या समूहाकडून अप्रतिमपणे सादर करण्यात आल्या. तब्बल १३ तास ३७ मिनिटे नृत्याविष्कार विश्वविक्रमाची नोंद, सह इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड (लंडन) नोंद करण्यात आली.
नृत्य पर्वणीला राज्यभरातील विविध गुरुकुलामधील ४०४ कलाकारांनी सहभाग नोंदविला. जवळपास ७ हजारपेक्षा अधिक लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून आणि ५०० लोकांनी प्रत्यक्ष अनुभवला. अहमदनगरमधील कथक नृत्यालय संचालिका कल्याणी कामतकर यांनी अहमदनगर शहरातील ५० कलाकारांचा सहभाग नोंदविला. आपल्या नृत्याचा आविष्कार सादर करून उपस्थितांना नेत्रसुखद अनुभव दिला. सलग ४८ मिनिटे विविध देवदेवतांच्या कथा नृत्यातून सादर केल्या. कथक नृत्याची तीन विश्वविक्रमी नोंद झाल्या. त्यात शरण्या आशिष वेळापुरे हिचा सहभाग होता. तिला सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.
वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अशिष वेळापुरे यांची शरण्या ही मुलगी तर ऑक्झिलिअम कॉन्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थिनी असून प्राचार्या व संचालिका रिटा लोबो यांनी तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी विश्वविक्रमात सहभाग नोंदवल्याबद्दल कौतुक केले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा