अहमदनगर | १८ ऑगस्ट | दिपक शिरसाठ
history छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक, ‘शोध भवानी तलवारीचा’ ग्रंथाचे कोल्हापूरस्थित लेखक प्रसिद्ध इतिहास संशोधक, लेखक इंद्रजित सावंत यांचे आज रविवार ता.१८ रोजी अहमदनगर येथे आले आहेत. ‘कादंबरीपलीकडील छत्रपती शिवाजी राजे समजून घेताना…’ या विषयावर त्यांचे माऊली सभागृह, झोपडी कँटीन येथे दुपारी ३:३० ते ७ या वेळेत व्याख्यान आयोजित करण्यात आले असून व्याख्यानानंतर ते उपस्थितांसोबत मुक्तसंवाद साधणार आहेत. कार्यक्रमासाठी सहकुटुंब मित्रपरिवारासह उपस्थित रहाण्याची विनंती करण्यात आली असून प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमाचे आयोजन हृदयरोग तज्ञ डॉ.धनंजय वारे, हृदयरोग तज्ञ डॉ. महेश जरे, ‘अक्षरमानव माऊली सेवा’चे डॉ.राजेंद्र धामणे, मधिंदु ऑप्टिकल्स’चे डॉ.रविकांत पाचारणे, रहेमत सुलतान फाऊंडेशन, रयत समाचार माध्यम परिवार यांनी केले आहे.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा