अहमदनगर | १३ ऑगस्ट | विजय मते
भारतीय जनता पक्ष या शिस्तप्रिय पक्षात काम करणारे youth स्वेच्छेने सर्व नियम, शिस्त पाळतात. निष्ठावान कार्यकर्त्यांमुळे पक्ष बळकट आहे. भाजपात पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला देखील न्याय मिळतोच असे प्रतिपादन भाजपा नगरशहर विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र तथा भैय्या गंधे यांनी केले.
शहरात गेल्या १५ ते २० वर्षांपासून भाजपामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाशी एकनिष्ठ प्रामाणिकपणे काम करणारे सुमित बटुळे यांची पक्षाने भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश सचिवपदी नियुक्ती केल्याबद्दल गंधे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रताप परदेशी, ज्ञानेश्वर काळे, तुषार पोटे, रेखा विधाते, शरद बारस्कर, लक्ष्मीकांत तिवारी, व्यंकटेश बोमादंडी, ऋग्वेद गंधे, सिद्धेश नाकाडे, भाग्यश्री कुलकर्णी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
महेंद्र गंधे यांनी यावेळी भाजपाची नाळ जनतेशी जुळली आहे. पण विरोधक अपप्रचार करुन सत्तेवर येण्याचा प्रयत्नात आहेत. कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय-धोरणे केलेली कामे, भाविष्यात विकासाचा डोंगर कसा उभारणार आहे, हे जनतेला सांगा. आपला विश्वास जनतेच्या मनात सार्थ ठरवा, असे आवाहन केले. सुमितने पदाची अपेक्षा न करता स्वत:च्या वेळ पक्षाला दिला. नि:स्वार्थपणे काम केले. त्यामुळे पक्षाने दखल घेत मोठी जबाबदारी त्याच्यावर दिली, न्याय दिला, असे गंधे यांनी स्पष्ट केले.
सत्काराला उत्तर देताना सुमित बटुळे यांनी पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास व दिलेली खुप मोठी जबाबदारी माझ्या सहकार्यांना बरोबर घेवुन पार पाडीन असे सांगितले. कार्यकर्ता म्हणून काम करत असताना पक्षाने जिल्हा सचिव, युवा मोर्चाच्या सावेडी मंडलाध्यक्ष अशा पदावर काम करण्याची संधी दिली. ती यशस्वीपेण पार पाडली. नव्याने दिलेली ही जबाबदारी देखील चांगले काम करुन पार पाडणार असल्याचे बटुळे यांनी यावेळी सांगितले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.