राजकीय, सामाजिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक विभागात रामदास राऊत आपल्या कामाचा ठसा उमटवतील – बाळासाहेब भुजबळ

अहमदनगर | विजय मते |२८.६.२०२४

सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देऊन काम करतांना अध्यात्मिक क्षेत्रात तसेच समाजाच्या जडण-घडणीमध्ये आपल्या कार्याचा मोलाचा वाटा देत राजकीय, सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण करणारे रामदास राऊत यांची चित्रपट कला सांस्कृतिक विभागाच्या पुण्याच्या जिल्हा उपाध्यक्षपदी झालेली निवडीने आपल्या कार्यातून, कामातून वेगळा ठसा उमटवतील, असा विश्वास नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी व्यक्त केला.

तृप्ती एन्टरप्राईजेसच्या चित्रपट कला व सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नाभिक समाजाचे रामदास राऊत यांची निवड झाल्याबद्दल नाभिक महामंडळाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, उपाध्यक्ष अनिल निकम, उपाध्यक्ष शामराव जाधव, पिंपळनेरचे श्री संत सेना महाराज ट्रस्टचे अध्यक्ष भाऊ बीडे, उद्योजक मच्छिंद्र घायतडक, सरपंच संतोष घायतडक, रामदास जाधव, सुनिल आतकर, प्रसाद भोसले, संजय वाघचौरे, नवनाथ राऊत, कृष्णकांत राऊत, गणेश वाघमारे, विनायक कुटे आदिनाथ बांगर आदि उपस्थित होते.

भुजबळ पुढे म्हणाले, रामदास राऊत राजकारणाबरोबरच समाजकारणामध्ये चांगले काम करतात. धार्मिक कार्यात नेहमीच सहभाग असतो. समाजमंदिर कामांसाठी मोठे योगदान त्यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांची झालेले निवड ही समाजासाठी अभिमानास्पद बाब आहे.
यावेळी जिल्ह्यातील नाभिक महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसाद भोसले यांनी तर नवनाथ राऊत यांनी आभार मानले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *