अहमदनगर (प्रतिनिधी) २२.६.२०२४
२९१ कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेच्या नगर अर्बन बँक घोटाळ्यातील पैशातून घेतलेल्या स्थावर मालमत्ता जप्त होतात, मग या पैशातूनच खरेदी केलेले सोने व महागड्या चारचाकी गाड्या जप्त का होत नाहीत ? असा परखड सवाल बँक बचाव समिती शिलेदार तथा माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केला आहे.
माहिती देताना त्यांनी संगितले की, एका कर्जदाराने तर रेकॉर्डब्रेक सोनेखरेदी केलेली खाते उताऱ्यावर स्पष्ट होत आहे. मग हे सोने गेले कोणीकडे? त्याचबरोबर अत्यंत महागड्या गाड्यांची खरेदी दिसून येत आहे. फॉरेंसिक ऑडीटरने याबाबत मौन बाळगलेले दिसत आहे. सोन्याची मोठी खरेदी बँकेच्या संचालकांच्या संबंधित दुकानातूनच हे काय गौडबंगाल आहे? संबंधित कर्जदाराने बार, रेस्टॉरंट, लॉजींगची मोठीमोठी बिले कर्जाच्या रकमेतून चुकविलेली आहेत. एकाएका वेळी ५०/६० हजारांची बिले चुकविली आहेत. या मोठ्या मोठ्या पार्ट्या नेमक्या कोणाला देण्यात आल्या ?
फॉरेंसिक ऑडीटरने यावर लक्ष का दिले नाही?
नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्याचा तपास परिपूर्ण झालेला नाही, हे नक्की. लहानलहान मुद्द्यावर काही जनांना आरोपी केलेले आहे. तर मोठे मोठे प्रकरणांसाठी साधा जाबजबाब देखील झालेला नाही. याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे, असे राजेंद्र गांधी म्हणाले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.