Madhyam Samvad Ahilyanagar: ‘माध्यम संवाद’ जिल्हा माहिती कार्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम; दर गुरुवारी होणार पत्रकार परिषदेचे आयोजन - Rayat Samachar

Madhyam Samvad Ahilyanagar: ‘माध्यम संवाद’ जिल्हा माहिती कार्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम; दर गुरुवारी होणार पत्रकार परिषदेचे आयोजन

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया साधणार माध्यमांशी संवाद

rayatsamachar
2 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

अहिल्यानगर | १६.९ | रयत समाचार

 Madhyam Samvad Ahilyanagar: जिल्ह्यातील विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रम आणि नागरिकांसाठीच्या विविध सेवांची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘माध्यम संवाद’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत दर गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येणार असून, प्रत्येक आठवड्यात एका विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व उपक्रमांची माहिती माध्यम प्रतिनिधींना देण्यात येणार आहे.

या उपक्रमाची सुरुवात गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे होणाऱ्या ‘माध्यम संवाद’ कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.

शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती नागरिकांना वेळेवर मिळणे तसेच त्याचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. ‘माध्यम संवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून संबंधित विभागांच्या कामकाजाची, योजनांची तसेच नागरिकाभिमुख उपक्रमांची माहिती माध्यम प्रतिनिधींना थेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विभागांकडून करण्यात येणारे काम व्यापक स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

Madhyam Samvad Ahilyanagar

या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया माध्यम प्रतिनिधींना देणार आहेत. नगर परिषदांच्या माध्यमातून नागरिकांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, स्थानिक पातळीवरील नव्या संकल्पना आणि त्यातून नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे.

‘माध्यम संवाद’ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशासन आणि माध्यम प्रतिनिधी यांच्यात नियमित संवादाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. विविध विभागांच्या कामकाजाची माहिती नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यास या उपक्रमाची मदत होणार असून, अधिकाधिक माध्यम प्रतिनिधींनी या पत्रकार परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी केले आहे.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading