ITSFFpune2026 | ‘दिंडी | Way Of Life’ची आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवासाठी अधिकृत निवड - Rayat Samachar

ITSFFpune2026 | ‘दिंडी | Way of Life’ची आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवासाठी अधिकृत निवड

पुण्यात २६ व २७ सप्टेंबरला महोत्सव

rayatsamachar
2 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

अहमदनगर | १२.९ | रयत समाचार

 

(ITSFFpune2026) वारकरी धर्माची परंपरा, श्रद्धा, संस्कृती आणि सामूहिक जीवनपद्धतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘दिंडी | Way of Life’ या लघुपटाची ५व्या International Tourism Short Film Festival (ITSFF) Pune 2026 साठी अधिकृत निवड झाली. महोत्सवाच्या आयोजकांनी जाहीर केलेल्या अंतिम Official Selection यादीवर ‘दिंडी | Way of Life’ या चित्रपटाचा तिसरा क्रमांक आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन भैरवनाथ चंद्रभागा तुकाराम वाकळे यांनी केले असून ‘नगरी-नगरी’चे किरण दत्तराज डहाळे यांनी आवाजासह साथसोबत केली आहे. अधिकृत निवड यादीत चित्रपटासमोर महाराष्ट्र असा उल्लेख करण्यात आला आहे.

(ITSFFpune2026) International Tourism Short Film Festival 2026 हा पर्यटन, संस्कृती, प्रवास आणि मानवी अनुभवांशी संबंधित लघुपटांना जागतिक मंच देणारा महोत्सव आहे. यंदाचा महोत्सव २६ व २७ सप्टेंबर २०२६ रोजी यशदा, बाणेर रोड, राजभवन परिसर, गणेशखिंड, पुणे येथे होणार आहे. महोत्सवासाठी प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे.

- Advertisement -

महोत्सवाच्या प्रसिद्धीपत्रकात आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये आयोजकांनी अंतिम निवड झालेल्या चित्रपटांचे स्वागत करताना, विविध संस्कृती, माणसे, अनुभव आणि पर्यटनस्थळांच्या कथा पडद्यावर आणणाऱ्या या चित्रपटांमुळे पर्यटनविश्वाला नवे दृश्यमाध्यम मिळत असल्याचे नमूद केले आहे.

ITSFFpune2026

(ITSFFpune2026) ‘दिंडी | Way of Life’ची अधिकृत निवड ही चित्रपटाच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाची नोंद ठरली. वारकरी दिंडीकडे केवळ धार्मिक यात्रेच्या दृष्टिकोनातून न पाहता, तिच्यामागील सामूहिकता, लोकसंस्कृती, परंपरा आणि जीवनदृष्टी मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला.

पुण्यात होणाऱ्या या महोत्सवात देशातील विविध राज्यांमधून निवड झालेल्या चित्रपटांसोबत ‘दिंडी | Way of Life’चेही प्रदर्शन होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संस्कृती आणि दिंडीची जीवनपद्धती व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी या निमित्ताने निर्माण झाली.

निरिक्षणप्रधान लघुपट ‘दिंडी | Way of Life’ च्या निर्मितीप्रक्रियेत विविध स्तरांवर सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचाही मोठा वाटा आहे. सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, सॅम्युअल वाघमारे, निहाल घोडके, संध्या मेढे, उज्ज्वला वाकळे, सायली तोरणे, तुषार सोनवणे, दिपक शिरसाठ, पंकज गुंदेचा, मरयम सय्यद, संतोष गायकवाड, विजय केदारे, समृद्धी वाकळे, समीक्षा वाकळे, एस्थर, रूतूजा शिंदे, खुशी राजभर, ईलिशा संगमा, इमान्युअल आणि जोस यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading