Ahilyanagar University: विद्यार्थ्यांनी रील स्टार नव्हे, रोल मॉडेल बनावे- अरविंद पारगावकर - Rayat Samachar

Ahilyanagar University: विद्यार्थ्यांनी रील स्टार नव्हे, रोल मॉडेल बनावे- अरविंद पारगावकर

अहिल्यानगर विद्यापीठ उपकेंद्रात स्वातंत्र्यदिन उत्साहात

rayatsamachar
2 Min Read
अहिल्यानगर उपकेंद्रातील स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना एल अँड टी कंपनीचे उपाध्यक्ष अरविंद पारगावकर.SubEditor | Dipak Shirsath

अहिल्यानगर | १५ ऑगस्ट | पंकज गुंदेचा 

Ahilyanagar University: स्वातंत्र्यानंतर भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला असून, भारताला महासत्ता बनविण्यासाठी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान आणि चांगले चारित्र्य विकसित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन एल अँड टी कंपनीचे उपाध्यक्ष अरविंद पारगावकर यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी केलेल्या बलिदानाची आठवण करून देत विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले.
अहिल्यानगर उपकेंद्राच्या सक्षमीकरणासाठी सीएसआर निधीतून विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे प्रगत संगणक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पारगावकर यांनी दिले.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. संदीप पालवे यांनी अहिल्यानगर उपकेंद्रात बी.एस्सी. डेटा सायन्स अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य अमोल घोलप यांनी विद्यार्थ्यांनी ‘रील स्टार न बनता रोल मॉडेल बनावे’, असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक कुलसचिव डॉ. शिवप्रसाद घालमे यांनी अहिल्यानगर उपकेंद्राच्या आजपर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सुरू झालेल्या बी.एस्सी. डेटा सायन्स अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या विविध योजनांचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी इलेक्ट्रिक स्कूल बसला मंजुरी मिळाल्याची माहितीही डॉ. घालमे यांनी दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास बी.एस्सी. डेटा सायन्स अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, सर्व शिक्षक, कर्मचारी व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. बी. के. थोरवे यांनी आभार मानले. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading