Drug Free Shrirampur | श्रीरामपूरने केला ‘ड्रग्ज फ्री’चा निर्धार! 1200 विद्यार्थ्यांची अमली पदार्थविरोधी जनजागृती रॅली - Rayat Samachar

Drug Free Shrirampur | श्रीरामपूरने केला ‘ड्रग्ज फ्री’चा निर्धार! 1200 विद्यार्थ्यांची अमली पदार्थविरोधी जनजागृती रॅली

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

rayatsamachar
2 Min Read
डी. डी. काचोळे विद्यालय व श्रीरामपूर पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या अमली पदार्थविरोधी जनजागृती रॅलीत सहभागी विद्यार्थी व मान्यवर. SubEditor | Dipak Shirsath

श्रीरामपूर | ६.८ | सलीमखान पठाण

(Drug Free Shrirampur) श्रीरामपूर पोलीस विभाग आणि डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अमली पदार्थविरोधी जनजागृती रॅलीला श्रीरामपूरकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. सुमारे १,२०० विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘ड्रग्ज फ्री श्रीरामपूर’चा निर्धार व्यक्त करत शहरभर जनजागृती करण्यात आली.

(Drug Free Shrirampur) रॅलीचे उद्घाटन डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे आणि रामचंद्र शिखरे यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे व पर्यवेक्षक सूर्यकांत सराटे उपस्थित होते.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या सूचनेनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी देवदत्त भवर तसेच पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
(Drug Free Shrirampur) यावेळी एपीआय चेतन लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना अमली पदार्थ तसेच इतर व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. “तरुणाईने व्यसनमुक्त राहून निरोगी आणि आनंदी जीवन जगावे. ‘ड्रग्ज फ्री श्रीरामपूर’ अभियानाला प्रत्येकाने साथ द्यावी,” असे त्यांनी सांगितले.
विद्यालयातील सुमारे १,२०० विद्यार्थ्यांनी हातात जनजागृतीचे फलक घेऊन शहरातून रॅली काढत नागरिकांना धूम्रपान, अमली पदार्थ आणि इतर व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश दिला. ही रॅली काचोळे विद्यालय – अक्षय कॉर्नर – शिवाजी रोड – नेवासा-संगमनेर रोड मार्गे काढण्यात आली.
रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस विभागातील गोपनीय शाखेचे प्रमुख कदम, पीएसआय चव्हाण तसेच विद्यालयाचे वसतिगृह अधीक्षक महेंद्र भराड, उपशिक्षक नानासाहेब मुठे, भाऊराव मुठे, संदीप कदम, वैजयंती सोनवणे, रवींद्र निकम यांनी मोलाचे सहकार्य केले.
या रॅलीत विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. अमली पदार्थमुक्त समाजाच्या दिशेने उचललेल्या या उपक्रमाचे श्रीरामपूरमधील नागरिक आणि पालकांनी भरभरून कौतुक केले.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading