Inner Wheel Helps Students: विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नये : राखी बिहानी - Rayat Samachar

Inner Wheel Helps Students: विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नये : राखी बिहानी

इनरव्हील क्लब व श्रीनिवास बिहानी फाउंडेशनकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

rayatsamachar
1 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

श्रीरामपूर | सलीमखान पठाण

Inner Wheel Helps Students: विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात उत्तुंग यश मिळवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले पाहिजेत. शिक्षण हे कुटुंबाचा तसेच समाजाचा विकास घडविणारे प्रभावी माध्यम आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी शिक्षणाइतके सक्षम साधन दुसरे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनांबरोबरच सोशल मीडियाच्या आहारी न जाता शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा राखी श्रीनिवास बिहानी यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या डी. डी. काचोळे माध्यमिक विद्यालयात वसतिगृह व रिमांड होममधील गरजू आणि निराधार विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लबश्रीनिवास बिहानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सौ. राखी बिहानी बोलत होत्या.
कार्यक्रमास इनरव्हील क्लबच्या उपाध्यक्षा सुप्रिया भोसले, सचिव डॉ. ऋतू लखोटिया, उषा मुंदडा, पद्मा भुतडा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे यांनी श्रीनिवास बिहानी परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. समाजातील गरजू व वंचित घटकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेले बिहानी दाम्पत्य हे समर्पणाचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या, पाण्याच्या बाटल्या आदी शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजयंती सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभागप्रमुख नानासाहेब मुठे यांनी केले.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading