श्रीगोंदा | माधव बनसुडे
Voice of Media Maharashtra: महिला पत्रकार गायत्री ढवळे यांची आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या महाराष्ट्र राज्य कार्यकारी समितीच्या राज्य कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल मार्के यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
पत्रकारितेतील सातत्यपूर्ण योगदान, संघटनेप्रती असलेली निष्ठा आणि पत्रकारांच्या हितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गायत्री ढवळे यांनी संघटनेच्या विविध उपक्रम, बैठका आणि पत्रकारांच्या प्रश्नांवर सक्रिय भूमिका बजावत संघटनेच्या कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. विशेषतः महिला पत्रकारांच्या प्रश्नांसह पत्रकारितेशी संबंधित विविध विषयांवर त्यांनी प्रभावीपणे भूमिका मांडली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय जबाबदारी देण्यात आली आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


