Apala Rashtradhwaj Book | राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिनानिमित्त ‘आपला राष्ट्रध्वज’ पुस्तकाचे प्रकाशन - Rayat SamacharApala Rashtradhwaj Book 'आपला राष्ट्रध्वज’ पुस्तकाचे प्रकाशन डोंबिवलीत संपन्न | आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते लोकार्पण

Apala Rashtradhwaj Book | राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिनानिमित्त ‘आपला राष्ट्रध्वज’ पुस्तकाचे प्रकाशन

मुलांमध्ये राष्ट्रध्वजाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम

rayatsamachar
2 Min Read
आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते डोंबिवली येथे ‘आपला राष्ट्रध्वज’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेSubEditor | Dipak Shirasath

डोंबिवली | २३.७ | गुरुदत्त वाकदेकर

(Apala Rashtradhwaj Book) राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिनानिमित्त २२ जुलै रोजी इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पूर्व आणि अक्षरमंच प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपला राष्ट्रध्वज’ या पुस्तकाचे प्रकाशन डोंबिवली येथील संकल्पतीर्थ १५० फूट राष्ट्रध्वजाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

(Apala Rashtradhwaj Book) कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात आमदार राजेश मोरे यांनी ‘आपला राष्ट्रध्वज’ हे पुस्तक राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या पुस्तकाच्या माध्यमातून मुलांना राष्ट्रध्वजाचा इतिहास, महत्त्व आणि त्याबाबतची योग्य माहिती मिळेल. त्यातून राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ होऊन सजग व आदर्श नागरिक घडण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

(Apala Rashtradhwaj Book) इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पूर्वच्या सर्व महिला सदस्या समाजोपयोगी आणि लोकहिताची विविध कामे अत्यंत हिरीरीने राबवत असून त्यांचे कार्य केवळ कौतुकास्पदच नव्हे, तर अनुकरणीय असल्याचेही आमदार मोरे यांनी नमूद केले.

डोंबिवली येथे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते ‘आपला राष्ट्रध्वज’ Apala Rashtradhwaj Book प्रकाशन सोहळा

‘आपला राष्ट्रध्वज’ हा उपक्रम आगळावेगळा असून त्यामागे इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा जयश्री पंडीत, सचिव लीना चौधरी, प्रकल्प प्रमुख संगीता खर्डीकर, प्रकल्प समन्वयक रोहिणी लोकरे तसेच या उपक्रमाचे संकल्पनाकार डॉ. योगेश जोशी यांनी घेतलेली मेहनत निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पूर्वच्या अध्यक्षा जयश्री पंडीत यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर अक्षरमंच प्रकाशनचे अध्यक्ष डॉ. योगेश जोशी यांनी ‘आपला राष्ट्रध्वज’ या पुस्तकामागील संकल्पना, उद्दिष्टे आणि राष्ट्रध्वजाविषयी जनजागृती करण्यामागील भूमिका उपस्थितांसमोर स्पष्ट केली. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक रोहिणी लोकरे आणि भक्ती भंडारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन भक्ती भंडारी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

DINDI Way of Life | आषाढी एकादशीला ‘दिंडी | Way of Life’चा यूट्यूब प्रीमियर; ‘पंढरीची वारी : समतेची समृद्ध जीवनपद्धती’ उलगडणारा निरीक्षणप्रधान 1मराठी लघुपट

🇮🇳 राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिनानिमित्त डोंबिवली येथे ‘आपला राष्ट्रध्वज’ पुस्तकाचे प्रकाशन आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा हा उपक्रम विशेष ठरला.
#आपला_राष्ट्रध्वज #Dombivli #RajeshMore #BookLaunch #RayatSamachar

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading