Shikhar Youth Foundation | ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी उभारी; शिखर यूथ फाउंडेशनकडून 1350 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट व रेनकोट - Rayat SamacharShikhar Youth Foundation पालघर : शिखर यूथ फ

Shikhar Youth Foundation | ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी उभारी; शिखर यूथ फाउंडेशनकडून 1350 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट व रेनकोट

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
शिखर यूथ फाउंडेशनच्या वतीने पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट व रेनकोटचे वितरणSubEditor | Dipak Shirasath

पालघर | १४.७ | गुरुदत्त वाकदेकर

ग्रामीण भागातील गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिखर यूथ फाउंडेशनच्या (Shikhar Youth Foundation) वतीने पालघर जिल्ह्यातील २५ जिल्हा परिषद शाळांमधील १,३५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट आणि रेनकोटचे वितरण करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

- Advertisement -

Shikhar Youth Foundation अभियानाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा, सोमटे येथून झाली. त्यानंतर नानिवली आश्रम शाळा आणि जिल्हा परिषद शाळा, नागझरी येथे वितरण कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांना वह्या, स्टेशनरी साहित्य आदींचा समावेश असलेले शैक्षणिक किट तसेच पावसाळ्यात सुरक्षितपणे शाळेत ये-जा करता यावी यासाठी रेनकोट देण्यात आले.

(Shikhar Youth Foundation) यावेळी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. आत्मविश्वासाने शिक्षण घेऊन मोठी स्वप्ने पूर्ण करण्याचा संदेश देण्यात आला. शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि पालकांनी व्यक्त केलेले समाधान हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

Shikhar Youth Foundation पालघरमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट आणि रेनकोट वाटप करताना शिखर यूथ फाउंडेशनचे पदाधिकारी

हा उपक्रम समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवक, हितचिंतक तसेच रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पोवई यांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाला. त्यांच्या योगदानामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध होऊन त्यांच्या शिक्षणाला महत्त्वपूर्ण आधार मिळाला.

 

शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि समाजकल्याण या क्षेत्रांत सातत्याने कार्यरत असलेल्या शिखर यूथ फाउंडेशनने या उपक्रमातून समाजाप्रतीची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. भविष्यातही वंचित व गरजू घटकांसाठी अशाच लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading