शेवगाव | १३.७ | रयत समाचार
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत शेवगाव तालुक्यातील आव्हाने बु. येथे शेतकऱ्यांसाठी ‘पीक विमा पाठशाळे’चे आयोजन करण्यात आले. Fruit Crop Insurance उपक्रमात शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेची माहिती, विमा भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळविण्यासाठी विम्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
हे ही वाचा : Ram Mandir Donation | मंदिरच सुरक्षित नाहीत तर आस्था कुठे सुरक्षित?; राममंदिर देणगी चोरीवर शंकराचार्यांचा संतप्त सवाल
Fruit Crop Insurance कार्यक्रमास परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. तसेच सेतू चालक सोमनाथ कळमकर आणि आव्हाने बु. येथील अनेक शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका फळपीक विमा Fruit Crop Insurance प्रतिनिधी नरहरी शहाणे यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेची उद्दिष्टे, लाभ, पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि नुकसानभरपाईसंदर्भातील महत्त्वाच्या बाबींची सविस्तर माहिती दिली. हवामानातील अनिश्चिततेमुळे फळबागांचे होणारे नुकसान लक्षात घेता विमा संरक्षण घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा : Public issue | तासन्तास वीज गेली? ग्राहक नुकसान भरपाई मागू शकतो; महावितरणचे नियम काय सांगतात?
यावेळी शेतकऱ्यांना फळपीक विमा भरण्याची अंतिम मुदत १४ जुलै असल्याची माहिती देण्यात आली. मुदत संपण्यापूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या फळपिकांचा विमा भरून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंतर्गत हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून फळबागांचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ किंवा इतर हवामानविषयक जोखमींचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळण्यास मदत होते.
History | स्वातंत्र्यप्रेमी महावीर विठोजीराजे होळकरांची एवढी कृर हत्या का? स्मृतिवार्ता, संजय सोनवणी
📢 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना!
फळपीक विमा भरण्याची अंतिम मुदत १४ जुलै आहे. आव्हाने बु. येथे आयोजित पीक विमा पाठशाळेत शेतकऱ्यांना योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
👉 संपूर्ण बातमी वाचा : Rayat Samachar
#शेवगाव #फळपीकविमा #शेतकरी #कृषी #RayatSamacha
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



