Abasaheb Kakade | कर्मयोगी काकडे जयंतीनिमित्त शहरटाकळी विद्यालयात वक्तृत्वाचा जल्लोष; 42 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग - Rayat SamacharAbasaheb Kakade कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त शहरटाकळी विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा

Abasaheb Kakade | कर्मयोगी काकडे जयंतीनिमित्त शहरटाकळी विद्यालयात वक्तृत्वाचा जल्लोष; 42 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणांतून उलगडला कर्मयोगी आबासाहेब काकडे कार्याचा प्रेरणादायी वारसा

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
शहरटाकळी विद्यालयात कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी व मान्यवरSubEditor | Dipak Shirasath

शेवगाव | १०.७ | शिवाजी घुगे

कर्मयोगी आबासाहेब काकडे (Abasaheb Kakade) यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रामेश्वर पालवे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी कर्मयोगी काकडे (Abasaheb Kakade) यांच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा प्रेरणादायी आढावा घेतला. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाषणांद्वारे आपली वक्तृत्वकला सादर केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करून उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.

(Abasaheb Kakade) जयंती कार्यक्रमास योगेश शेळके, दत्ता देहाडराय आणि दत्तात्रय भालेराव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन श्रीमती दारकुंडे, श्रीमती हांडे आणि दिपक बोडखे यांनी केले.

Abasaheb Kakade कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या जयंतीनिमित्त शहरटाकळी विद्यालयातील वक्तृत्व स्पर्धा

विद्यालयाच्या प्राचार्या चिंतामण मॅडम आणि पर्यवेक्षक खताळ यांनी उपक्रमाबद्दल आयोजक शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करून अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत असल्याचे सांगितले.

हे ही वाचा : Crime | रस्ता ‘चोरी’ला गेला ? नागरिकांना माहिती असावी मनपाच्या ‘ताब्यातील रस्त्यांची नोंदवही’ 

- Advertisement -
वक्तृत्व स्पर्धेत एकूण ४२ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक बोडखे यांनी, आभार प्रदर्शन अनिता दारकुंडे यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकलेला नवी दिशा मिळाली असून कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या विचारांचा प्रेरणादायी वारसा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला.

History | स्वातंत्र्यप्रेमी महावीर विठोजीराजे होळकरांची एवढी कृर हत्या का? स्मृतिवार्ता, संजय सोनवणी


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading