Devidas Sonatakke | पर्यावरण क्षेत्रातील कार्याची दखल; सोनटक्के यांची जिल्हा उपाध्यक्षपदी 2026साठी निवड - Rayat SamacharDevidas Sonatakke देविदास सोनटक्के यांची अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; पर्यावरण क्षेत्रातील कार्याची दखल

Devidas Sonatakke | पर्यावरण क्षेत्रातील कार्याची दखल; सोनटक्के यांची जिल्हा उपाध्यक्षपदी 2026साठी निवड

निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची जबाबदारी; शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड यांच्या हस्ते देविदास सोनटक्के यांचा सत्कारSubEditor | Dipak Shirasath

पाथर्डी | ६.७ | पंकज गुंदेचा

(Devidas Sonatakke) निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्यच्या अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी टाकळीमानूर येथील श्रीभवानी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य देविदास सोनटक्के यांची सन २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

Devidas Sonatakke देविदास सोनटक्के यांची निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

(Devidas Sonatakke) देविदास सोनटक्के यांनी शिक्षण क्षेत्राबरोबरच पर्यावरण संवर्धन, सामाजिक जनजागृती आणि विविध लोकहिताच्या उपक्रमांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मंडळाने त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली.

(Devidas Sonatakke) या निवडीबद्दल गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड यांनी पुष्पगुच्छ देऊन सोनटक्के यांचे अभिनंदन केले. आपल्या मनोगतात त्यांनी सोनटक्के यांच्या कार्याचे कौतुक करत पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक उपक्रमांतील त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हे ही वाचा : Ram Mandir Donation | मंदिरच सुरक्षित नाहीत तर आस्था कुठे सुरक्षित?; राममंदिर देणगी चोरीवर शंकराचार्यांचा संतप्त सवाल

- Advertisement -
विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवकवृंद यांच्या वतीनेही सोनटक्के यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण संवर्धन, सामाजिक जनजागृती आणि लोकसहभागाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

हे ही पहा : RSYT : अडीच हजार वर्षांपूर्वी विटांवर कोरलेल्या ‘सिंह सेनापती’ कादंबरीचा मराठी अनुवाद

यावेळी देविदास सोनटक्के यांनी सर्वांचे आभार मानत मंडळाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. पर्यावरण संरक्षण, सामाजिक जनजागृती आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.

Yoga Day | 21जून आंतरराष्ट्रीय योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading