नवी मुंबई | ३० जून | प्रदीप बडदे
(Shanta Shelke Memorial) कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतिनिमित्त साहित्य भारती, कोकण प्रांत, नवी मुंबई शाखेच्या वतीने वाशी येथील आयईएस हायस्कूल येथे ‘काव्यसंध्या’ या विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शांताबाईंच्या कवितेवरील रसग्रहण हा कार्यक्रमाचा प्रमुख विषय असून काव्यप्रेमींनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
(Shanta Shelke Memorial) ता. २६ जून २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध लेखिका यामिनी पानगावकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी साहित्य भारती, कोकण प्रांताचे अध्यक्ष प्रवीण देशमुख होते. नवी मुंबई साहित्य परिषद तसेच अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. अरुंधती जोशी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
हे ही वाचा : योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा
(Shanta Shelke Memorial) नवी मुंबईसह परिसरातील विविध भागांतून सहभागी झालेल्या युवा कवी कवयित्रींनी काव्यवाचन, शांताबाईंच्या कवितांचे रसग्रहण, पुस्तक परिचय आणि त्यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत कार्यक्रम अधिक समृद्ध केला. प्रमुख पाहुण्या यामिनी पानगावकर यांनी साहित्य, कविता आणि सर्जनशीलतेविषयी प्रेरणादायी संवाद साधत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्रवीण देशमुख यांनी साहित्य भारतीची वाटचाल, उद्दिष्टे आणि ध्येय स्पष्ट करत मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी अशा साहित्यिक उपक्रमांचे आयोजन अधिक व्यापक स्वरूपात करण्यात येईल, असे सांगितले.
हे ही पहा : RSYT : अडीच हजार वर्षांपूर्वी विटांवर कोरलेल्या ‘सिंह सेनापती’ कादंबरीचा मराठी अनुवाद
यावेळी साहित्य भारती, नवी मुंबई शाखेच्या नूतन कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले. दिलीप जांभळे सर यांच्या हस्ते प्रवीण देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा व साहित्यिकांचा परिचय ऋतुजा गवस यांनी करून दिला. सूत्रसंचालन रश्मी राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन मानसी राऊत यांनी मानले.
या काव्यमैफिलीत नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल परिसरातील राधा गानू, अस्मिता सावंत, अनिता बाविस्कर, संगीता उपाध्ये, नीला पुरंदरे, अलका अग्निहोत्री, संध्या देशपांडे, अपर्णा ठाकूर, वंदना पाटील, प्रदीप बडदे, चारुशीला म्हात्रे, ज्योती राखुंडे आणि सारिका पिसाळ यांनी प्रभावी काव्यरसग्रहण सादर केले. तसेच कल्पना देशमुख, क्षमा वखारकर आणि दिलीप जांभळे सर यांचीही उपस्थिती लाभली.
साहित्य, कविता आणि संवेदनशील अभिव्यक्तीचा सुंदर संगम घडविणाऱ्या या अनोख्या काव्यसंध्येला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाला भरभरून दाद दिली.
Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



