Ad imageAd image

Public issue | रक्तनात्यातील समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने तातडीने परिपत्रक काढावे

कोळी महासंघाचे आंदोलन

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

अहमदनगर | १६ जून | रयत समाचार

(Public issue) अनुसूचित जमातीतील कोळी समाज बांधवांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे, तसेच रक्त नात्यातील समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, या मागणीसाठी कोळी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आले.

(Public issue) कोळी महासंघाने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले होते. मात्र त्यानंतर विधानसभा, महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे संबंधित परिपत्रक जारी होण्यास विलंब झाला.

(Public issue) या विलंबामुळे समाजामध्ये नाराजी वाढत असून शासनाने बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करून आवश्यक परिपत्रक तातडीने काढावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

कोळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय तातडीने पाठवून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. यावेळी संदीप मोरे, बंडा बबन मोरे, जयंत दत्तात्रय होळकर, सुनील पवार, कानिफ मोरे, उद्धव मोरे, मिथुन मोरे, लक्ष्मण मोरे, पंडा मोरे, शामराव मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

हे हि वाचा :Cultural Politics | ‘वैदिकीकरण’ ही प्रवृत्ती वारंवार डोके वर का काढते आहे, संजीव सोनवणी यांचा सवाल 

 

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading