पंढरपूर | १३.६ | रयत समाचार
(Politics) राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली असून, उपजिल्हाधिकारी सचिन इथापे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे आणि तहसीलदार सचिन लंगोटे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.
यावेळी कृषिमंत्री दत्तामामा भरणे आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क घडवून आणल्याची माहिती कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिली.
(Politics) या विषयी आमदार रोहित पवार यांनी माहिती दिली, पुढील दोन-तीन दिवसांत या विषयावर बैठक घेण्याचे आश्वासन संबंधित मंत्र्यांनी दिले. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशीही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, राज्यातील कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याने प्रसारमाध्यमांसमोर येऊन कर्जमाफीवरील जाचक अटी रद्द करण्याबाबत स्पष्ट आणि ठोस भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
(Politics) कर्जमाफीचा निर्णय घेताना घालण्यात आलेल्या अटीशर्तींमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सरकारला या संतापाची पुरेशी जाणीव झालेली दिसत नसली तरी राज्यभरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात अस्वस्थ आहेत. या अटींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जोपर्यंत कर्जमाफीवरील जाचक अटी रद्द होत नाहीत किंवा त्याबाबत स्पष्ट आश्वासन दिले जात नाही, तोपर्यंत आंदोलनातून माघार घेतली जाणार नाही, अशी ठाम भूमिका आमदार रोहित पवार यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे ही पहा : FDA | ‘गुटखा तस्करां’ना मोक्का लावणार – तुकाराम मुंढे; पत्रकार परिषद व्हिडीओ पहा
Cultural Politics | एकात्मिक मानववाद, ढोंगाचा बाजार आणि पंडीत दीनदयाळ यांची फसवणूक
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.




