Press | इतिहास अभ्यासक पत्रकार भूषण देशमुख यांचे निधन

इतिहासाचा चालता बोलता खजिना हरपला

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ६.६ | रयत समाचार

(Press) अहमदनगर शहरावर अपार प्रेम करणारे, निजामी इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि नगरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी आयुष्य वेचणारे तथा सीएसआरडीमधील बीजेएमसी पत्रकारीता महाविद्यालयाचे शिक्षक भूषण गोपाळ देशमुख यांचे आज ता. ६ जून २०२६ रोजी दुपारी सव्वा दोन वाजता निधन झाले. त्यांचे वय ६४ वर्षे होते. त्यांच्या निधनाने अहमदनगरच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वैचारिक क्षेत्रावर शोककळा पसरली.
(Press) गेल्या अनेक वर्षांपासून ‘हेरिटेज वॉक’ या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी नगरकरांना शहराच्या समृद्ध इतिहासाची ओळख करून दिली. नगरच्या ऐतिहासिक वास्तू, निजामी परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांचा अभ्यास करून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी सातत्याने केले.
(Press) याशिवाय, स्नेहालयच्या ९०.४ एफएम ‘रेडिओ नगर’चे संचालक म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केले. सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकाभिमुख विषयांना माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते.
त्यांच्या निधनामुळे नगरने इतिहासाचा जाणकार अभ्यासक, संस्कृतीप्रेमी व्यक्तिमत्त्व आणि शहराचा खरा प्रेमी गमावला असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० या वेळेत रेडिओ नगर, लेंडकर मळा, बालिकाश्रम रस्ता येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता अमरधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. भूषण देशमुख यांच्या रूपाने नगरच्या इतिहासाचा एक जिवंत दुवा आज कायमचा हरपला.
अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाच्यावतीने असिफखान दूलेखान, इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, भैरवनाथ वाकळे, सचिन डागा आदींना तर सीएसआरडी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. सुरेश पठारे, सॅम्युअल वाघमारे तर दै.रयत समाचार टीमच्या वतीने संध्या मेटे, दिपक शिरसाठ, तुषार सोनवणे, मरयम सय्यद, पंकज गुंदेचा, संतोष गायकवाड, दत्ताभाऊ वडवणीकर, संदीप सोनवणे यांनी कैलासवासी भूषण देशमुख यांना आदरांजली वाहीली.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading