Art | 'सम्याच्या मैफिली’चा सुवर्णक्षण; ११६ हाऊसफुल्ल प्रयोगांनंतर चौघुले यांना ‘सर्वोत्कृष्ट एकपात्री कलावंत’ पुरस्कार - Rayat Samachar

Art | ‘सम्याच्या मैफिली’चा सुवर्णक्षण; ११६ हाऊसफुल्ल प्रयोगांनंतर चौघुले यांना ‘सर्वोत्कृष्ट एकपात्री कलावंत’ पुरस्कार

रसिकांच्या प्रेमाची पावती; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा मानाचा सन्मान

rayatsamachar
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई |३०.५ | रयत समाचार

(Art) मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय एकपात्री कलाकार समीर चौघुले यांच्या ‘सम्याच्या मैफिली’ या कार्यक्रमाने आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून त्यांना प्रतिष्ठेचा ‘के. कमलाकर वैषंपायन स्मृती पुरस्कार : सर्वोत्कृष्ट एकपात्री कलावंत’ पुरस्कार जाहीर झाला.
(Art) रसिकांना निखळ आनंद आणि हास्य देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘सम्याच्या मैफिली’ने आजवर तब्बल ११६ हाऊसफुल प्रयोगांचा विक्रम नोंदवला आहे. देशासह परदेशातील मराठी रसिकांनीही या कार्यक्रमावर भरभरून प्रेम व्यक्त केले असून, या यशामागे प्रेक्षकांचे प्रेमच सर्वात मोठी ताकद असल्याची भावना समीर चौघुले यांनी व्यक्त केली.
(Art) रसिकांच्या आयुष्यातील अडीच तास आनंदाचे आणि हसरे व्हावेत, या प्रामाणिक हेतूने हा प्रवास सुरू केला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने या कामाची दखल घेत हा मानाचा पुरस्कार जाहीर केला, यापेक्षा कलाकाराला आणखी काय हवे? अशा भावनिक शब्दांत समीर चौघुले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या पुरस्कारानंतर मराठी रंगभूमी आणि मनोरंजन क्षेत्रातून समीर चौघुले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, रसिकांच्या प्रेमामुळेच हा प्रवास अधिक समृद्ध झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
सम्याच्या मैफिलीला मिळणारे रसिकांचे आशीर्वाद आणि प्रेम हेच माझे खरे यश आहे, असे म्हणत त्यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बोरिवली शाखा, मध्यवर्ती शाखा आणि सर्व रसिकांचे आभार मानले.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading