Cultural Politics | ‘वैचारिक घुसखोरी’विरोधातील लढा सुरूच राहणार- लवांडे; चळवळ थांबणार नसल्याचा निर्धार 

व्यक्तींविरोधातील नव्हे तर प्रवृत्तीविरोधातील लढाई

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shiradath

पुणे | २८.५ | रयत समाचार

(Cultural Politics) संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये वाढत असलेल्या वैचारिक प्रदूषण आणि घुसखोरीविरोधातील आपली चळवळ आगामी काळात अधिक व्यापक स्वरूपात सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन भागवत वारकरी महासंघाचे समन्वयक विकास लवांडे यांनी केले.

(Cultural Politics) या संदर्भात विकास लवांडे यांनी सांगितले, वारकरी संप्रदायातील वैचारिक घुसखोरीविरोधात जनजागृती सुरू केल्यानंतर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला तसेच पुणे पोलिसांनी खोट्या तक्रारीच्या आधारे बेकायदेशीर आणि मनमानी पद्धतीने अटक केल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण काळात अनेक समविचारी कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी, मित्र, वारकरी मान्यवर, पत्रकार, विचारवंत तसेच विविध स्तरातील नागरिकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठबळ दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

(Cultural Politics) लवांडे यांनी विशेषतः ॲड. मिलिंद पवार व त्यांच्या कायदेशीर टीमचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीतील विविध नेते आणि प्रतिनिधी यांचे आभार मानले.
ही चळवळ कोणत्याही व्यक्तींविरोधात नसून विशिष्ट प्रवृत्तीविरोधातील आहे. संतांचे शुद्ध आचार-विचार आणि भागवत परंपरेचे मूळ तत्त्व जपण्यासाठी अभ्यासू आणि खरे वारकरी पुढे येणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले. ‘बुडती हे जन, न देखवे डोळा’ या संतवचनाचा उल्लेख करत लवांडे यांनी वैचारिक, तात्विक आणि सांस्कृतिक लढा सनदशीर मार्गाने पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
सध्या पोलिसांनी मोबाईल जप्त केल्याने संपर्कात अडचणी येत असून, मोबाईल परत मिळाल्यानंतर नियमितपणे पुन्हा संपर्कात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

India news | आरक्षण, स्पर्धा परीक्षा आणि लॅटरल एन्ट्री : नेमकं कुणासाठी चाललंय सरकार?


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading