Ed | ‘डीपी’पासून दिल्लीपर्यंत चर्चा; प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित?

मालमत्ता ईडीकडून पुर्वीच रिलिज

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

राहुरी | २७.५ | रयत समाचार

(Ed) राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राजकीय भवितव्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता अधिक वेग आला आहे. सोशल मीडियावरील डीपी बदलल्यानंतर सुरू झालेल्या तर्कवितर्कांदरम्यान तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जवळपास निश्चित केल्याची माहिती समोर येत आहे.

येत्या ३० मे रोजी ते भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करतील, तर १ जून रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

(Ed) सूत्रांच्या माहितीनुसार, या घडामोडींसाठी तनपुरे अमेरिकेहून नियोजित वेळेपूर्वीच भारतात परतले असून सध्या मुंबईत महत्त्वाच्या राजकीय भेटीगाठी सुरू आहेत. दुसरीकडे त्यांच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.

(Ed) तनपुरे यांनी काल आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरील डीपी बदलला होता. हात जोडून नमस्कार करतानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच त्यांचे मामा जयंत पाटील यांचे छायाचित्र दिसत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. आता त्या चर्चांचा उलगडा होत असल्याचे मानले जात आहे.

राहुरी पोटनिवडणुकीच्या काळातच भाजपकडून तनपुरे यांना काही आश्वासने देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. निवडणूक काळात इडीनेही त्यांची अब्जावधी रूपयांची मालमत्ता रिलिज केली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रभावी राजकीय घराणे भाजपमध्ये येणे पक्षासाठी फायदेशीर मानले जात असल्याने भाजप नेतृत्वही या हालचालींकडे गांभीर्याने पाहत असल्याचे बोलले जाते. मात्र आतापर्यंत तनपुरे यांच्याकडून अंतिम निर्णय होत नव्हता. आता मात्र त्यांच्या कुटुंबीयांची आणि समर्थकांची मानसिक तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, भाजपकडून विधानपरिषदेसाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने काहीसा पेच निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र तनपुरे यांनी थेट पक्षप्रवेश केल्यास संभाव्य विरोध कमी होऊ शकतो, अशीही चर्चा आहे. त्यानंतर इतर इच्छुकांना भविष्यात संधी देण्याचे आश्वासन दिले जाऊ शकते.

राजकीय विश्लेषकांच्या मते, तनपुरे उमेदवार ठरल्यास या मतदारसंघातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. भाजपसाठी निवडणूक अधिक सोपी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील काही दिवसांत या संदर्भातील राजकीय हालचाली आणखी वेग घेण्याची चिन्हे आहेत.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading