अहमदनगर | २३.५ | रयत समाचार
(Politics) “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत सुरू असताना मंचावरीवरील राज्यमंत्री दत्ता भरणे, आमदार संग्राम जगताप यांच्यासह इतर मान्यवर बसून असल्याचा प्रकार शब्दगंध साहित्य संमेलनात घडल्याने संतापाची लाट उसळली. राज्यगीताचा सन्मान राखण्याबाबत शासनाने स्पष्ट प्रोटोकॉल जाहीर केलेला असताना त्याचे उल्लंघन झाल्याची चर्चा साहित्यिक व उपस्थितांमध्ये रंगली.
(Politics) महाराष्ट्र शासनाने १९ फेब्रुवारी २०२३ पासून “जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारले. शासन निर्णयानुसार राज्यगीत सुरू असताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहून सन्मान व्यक्त करणे अपेक्षित आहे.
(Politics) मात्र, शब्दगंध साहित्य संमेलनातील कार्यक्रमात राज्यगीत सुरू असताना मंचावरील प्रमुख पाहुणे जागेवरच बसून असल्याचे उपस्थितांनी निदर्शनास आणून दिले. साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणिवांचा संदेश देणाऱ्या मंचावरच राज्यगीताच्या प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ‘राज्यगीत सुरु असतांना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान करावा’ असे स्पष्ट नमूद करण्यात आले, तसेच राष्ट्रगीताप्रमाणेच राज्यगीताचाही योग्य सन्मान राखण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
संबंधित व्हिडीओ पहा : https://youtu.be/G4wVfDiAgj0?si=Ts4PNzt17wOTVNnD
शिवजयंतीच्या औचित्याने राज्यगीताचा अधिकृत स्वीकार करण्यात आला असून महाराष्ट्राच्या अस्मिता, शौर्य आणि अभिमानाचे प्रतीक असलेल्या या गीताचा सार्वजनिक कार्यक्रमात अवमान होणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया अनेक साहित्यप्रेमींनी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकाराबाबत आयोजक किंवा संबंधित मान्यवरांकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
India news | आरक्षण, स्पर्धा परीक्षा आणि लॅटरल एन्ट्री : नेमकं कुणासाठी चाललंय सरकार?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
