अहमदनगर | २०.५ | रयत समाचार
(Health) रायपूर येथील गल्ली क्रमांक ६, श्रीरामनगर फेज-१ येथील प्रकाश चंदवानी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अत्यंत प्रेरणादायी निर्णय घेत त्यांच्या अमूल्य नेत्रांचे दान केले. या नेत्रदानामुळे दोन नेत्रहीन व्यक्तींना नव्याने जग पाहण्याची संधी मिळणार आहे.
(Health) या महान कार्यासाठी त्यांचे चिरंजीव मोहित, हेमंत तसेच संपूर्ण परिवाराने पुढाकार घेतला. समाजसेवक राजेश वाधवानी, अरबिंदो हॉस्पिटल (Aurobindo Hospital) येथील डॉ. रिशिका, आय टेक्निशियन शशांक शर्मा, तकदीर जैन आणि रुग्णालयातील स्टाफ यांनी रात्री २ वाजेपर्यंत नेत्रदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.
(Health) अहिल्यानगर येथील नेत्रदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेले हरिकिशन माखीजा यांनी सांगितले की, एका व्यक्तीच्या दोन डोळ्यांमुळे दोन नेत्रहीनांना नवीन जीवन मिळू शकते. त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करावा.
हरिकिशन माखीजा यांनी आजपर्यंत तब्बल २७६ अमूल्य डोळ्यांचे नेत्रदान घडवून आणले असून, त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी आवाहन केले की, कुणाचे निधन झाल्यास, नेत्रदान करण्याची इच्छा असल्यास 97625 66129 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, जेणेकरून नेत्रदानासारखे पुण्यकार्य घडू शकेल.
मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश देण्याचे सामर्थ्य नेत्रदानात आहे, असा संदेश या घटनेतून समाजासमोर आला आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
