राहाता | २०.५ | रयत समाचार
(Social) ग्रामीण भागातील रुग्णांना रात्री-अपरात्री स्वतः रुग्णालयात दाखल करून वेळेवर उपचार मिळवून देत शेकडो लोकांचे प्राण वाचविणारे पुखराज पिपाडा यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा, असे आवाहन भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केले.
(Social) गुरुदेव दत्त पतसंस्थेचे माजी चेअरमन पुखराज पिपाडा यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त गणेश परिसराच्या वतीने आयोजित सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.
(Social) कार्यक्रमाला प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा, बाळासाहेब गाढवे, संघपती अनिल पिपाडा, रावसाहेब गाढवे, बाबासाहेब गोरे, नरेंद्र पिपाडा, ज्ञानेश्वर चौधरी, राजुशेठ मुनावत, दिलीप क्षिरसागर, सुरेश नाबरिया, नेमिचंद लोढा, डॉ. संतोष भवर, महावीर पिपाडा, पारस पिपाडा, गणेशशेठ भळगटीया, बबनराव घोरपडे, जयाभाऊ काले, जनार्दन गाढवे, शिवाजी सोनवणे, संदीप भळगट, अरुण संकलेचा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुखराज पिपाडा यांच्या सामाजिक, आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. राजेंद्र पिपाडा म्हणाले की, पुखराजजी हे केवळ आपल्या समाजापुरते मर्यादित नसून सर्वसामान्यांच्या अडचणींना धावून जाणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी गुरुदेवदत्त पतसंस्था प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आणि दूरदृष्टीने चालवत अनेक कुटुंबांना आर्थिक आधार दिला.
ते पुढे म्हणाले की, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून पुखराजजींनी आयुष्यभर कार्य केले. कोणाचे सुख असो वा दुःख, प्रत्येक प्रसंगी ते मनापासून सहभागी होतात. त्यांच्या शांत, संयमी, प्रेमळ आणि साधेपणाने भारलेल्या स्वभावामुळे समाजात त्यांना विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. ‘साधी राहणी आणि उच्च विचार’ या तत्वाचे ते खऱ्या अर्थाने जिवंत उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गुरुदेवदत्त पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, छोटे व्यापारी आणि सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक मदत उपलब्ध करून देत त्यांनी सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेती आणि ग्रामीण जीवनाशी असलेली त्यांची नाळ आजही घट्ट असून शेतकऱ्यांच्या समस्या ते अत्यंत जवळून समजून घेत असल्याने ग्रामीण भागात त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता आणि आदराची भावना असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
यावेळी पुखराज पिपाडा यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या दीर्घ सामाजिक कार्याचा गौरव करत उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भविष्यातही समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
India news | आरक्षण, स्पर्धा परीक्षा आणि लॅटरल एन्ट्री : नेमकं कुणासाठी चाललंय सरकार?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
