World news | बिल गेट्स प्रकल्पातून दर आठवड्याला 3 कोटी डासांची निर्मिती; डेंग्यू झिका रोखण्यासाठी नवा प्रयोग ?

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

आरोग्यवार्ता | १८.५ | रयत समाचार

(World news) डास हे सामान्यतः डेंग्यू, झिका, चिकुनगुनिया आणि यलो फीव्हर यांसारख्या धोकादायक आजारांचे वाहक मानले जातात. मात्र आता याच डासांचा वापर करून हे आजार रोखण्याचा मोठा वैज्ञानिक प्रयोग सुरू झाला आहे.

(World news) मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या पाठबळ असलेल्या एका प्रकल्पांतर्गत दर आठवड्याला तब्बल ३ कोटी डास सोडले जात असल्याची माहिती समोर आली. या प्रकल्पामागील उद्देश डासांची संख्या वाढवणे नसून, आजार पसरवणाऱ्या डासांच्या प्रजनन चक्रात बदल घडवून संसर्ग कमी करणे हा आहे. संशोधक विशेष प्रकारचे नर डास तयार करतात. हे डास माणसांना चावत नाहीत, मात्र मादी डासांशी संयोग झाल्यानंतर पुढील पिढीतील डासांची वाढ रोखली जाते किंवा त्यांच्यामधून विषाणू पसरत नाहीत.

(World news) काही ठिकाणी ‘वोल्बाकिया’ नावाच्या जीवाणूंचा वापर करून डासांमधील विषाणूंची क्षमता कमी करण्याचे प्रयोगही सुरू आहेत. वैज्ञानिकांच्या मते, या तंत्रज्ञानामुळे डेंग्यू आणि झिका यांसारख्या रोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणता येऊ शकतो.
विशेष म्हणजे, रासायनिक फवारणी किंवा कीटकनाशकांच्या तुलनेत ही पद्धत अधिक पर्यावरणपूरक मानली जात आहे. जगातील विविध देशांमध्ये या प्रयोगांचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्याने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात या संशोधनाकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे.
तज्ज्ञांनी मात्र अशा जैविक प्रयोगांवर सातत्याने वैज्ञानिक नियंत्रण आणि पर्यावरणीय अभ्यास आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading