Social | अंनिस’चे कृष्णा चांदगुडे यांना लाच देण्याचा प्रयत्न; पोलिसात तक्रार दाखल 

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नाशिक | २७.४ | रयत समाचार

(Social) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या ३५ वर्षांपासून सामाजिक काम करत आहे. पण त्यांच्या सामजिक प्रतिष्ठेवर कधी प्रश्न उपस्थित झाले नाही. अशातच भोंदूगिरीतील तक्रार मागे घेण्यासाठी अंनिस कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांना लाच देण्याचा प्रयत्न झाला. याबाबत त्यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार दिली गेली आहे.

(Social) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील भोंदू महेशगिरी काकडे बाबावर गुन्हा दाखल झाला. त्याला अटकही झाली असून त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. त्याचा दरबार आता बंद झाला आहे. त्यामुळे त्याचे नातेवाईक चिडून गेले आहे. बाबाच्या साथीदाराने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांचा मोबाईल क्रमांक मिळवला. भोंदू बाबाच्या भाच्याने एका पक्षाच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला मध्यस्थी घालून चांदगुडे यांना शुक्रवारी ता. २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६:५६ वाजता मोबाईलवर संपर्क केला. किरकोळ बोलल्यानंतर त्या व्यक्तीने महत्वाचे बोलण्यासाठी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर चांदगुडे यांनी भेटता येणार नाही, कॉलवरच बोला असे सांगितले. त्यावर त्या व्यक्तीने प्रकरण मिटवून घेण्यासाठी बाबाचा भाचा पैसे देवू इच्छित असल्याचे सांगितले. त्यावर चांदगुडे यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला. ही माहिती चांदगुडे यांनी अंनिस कार्यकर्ते व इंदिरानगर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांना सांगितली.

Social
कृष्णा चांदगुडे
(Social) चांदगुडे यांनी वरील आशयाची तक्रार इंदिरानगर पोलिस ठाण्यात दिली. याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे पोलीसांनी म्हटले आहे.

हे ही पहा : संबंधित माहितीचा व्हिडीओ पहा 

लाच घेण्याप्रमाणे लाच देणे पण गुन्हा आहे, या प्रकारामुळे माझ्या व चळवळीच्या सामाजिक प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नये, हा संदेश देण्यासाठी तक्रार दाखल केली आहे, असे अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी 982263037 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading