नगर तालुका | ११.४ | रयत समाचार
(Social) समता फाउंडेशन, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे तसेच सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालय आणि ग्रामपंचायत आगडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रा.डॉ. सुरेश मुगुटमल व सीएसआरडी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे शिबिराचे नियोजन व अंमलबजावणी प्रभावीपणे पार पडली.

(Social) शिबिरात एकूण ६४ ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली, त्यातील १८ रुग्णांची शस्त्रक्रिया पुणे येथे मोफत करण्यात येणार आहे. संबंधित रुग्णांसाठी ने-आण, राहण्याची व जेवणाची सोय आयोजकांकडून विनामूल्य करण्यात येणार आहे.
(Social) तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन केले. शस्त्रक्रियेनंतर लागणारी औषधे व काळे चष्मेही मोफत देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमास सरपंच परमेश्वर पालवे, समता फाउंडेशनचे समन्वयक अभिषेक शिंदे तसेच डॉक्टरांची उपस्थिती होती. शिबिराचे आयोजन सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी सागर टिके व रोहन सोनवणे यांनी केले.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
