जामखेड |२७.४ | रयत समाचार
(Politics) वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी पक्ष यांच्या वतीने ता. २७ एप्रिल रोजी जामखेड तहसील कार्यालयासमोर ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. हा उपक्रम वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड.डॉ. अरुण आबा जाधव आणि नगरसेविका संगीताताई भालेराव यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
(Politics) यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड तसेच बागेश्वर महाराज यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध करण्यात आला. उपस्थितांनी घोषणाबाजी करत संबंधितांविरोधात कारवाईची मागणी केली.
(Politics) कार्यक्रमात ॲड.डॉ. अरुण आबा जाधव यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. शिवाजी महाराजांचे लोकाभिमुख राज्यकारभार, रयतेप्रती कणव, शेतकरी व सामान्य जनतेशी असलेली बांधिलकी, व्यापार उद्योग संरक्षण, गुलाम व्यापारास बंदी, धार्मिक सहिष्णुता, मुस्लीम सरदारांचा सहभाग, स्त्रियांच्या सन्मानाचे धोरण, तसेच इतिहासातील विविध संदर्भांवर त्यांनी मुद्देसूद विवेचन केले.
यावेळी बोलताना त्यांनी आमदार संजय गायकवाड यांनी राजीनामा द्यावा तसेच बागेश्वर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. शिवाजी महाराजांबद्दल कुणीही अपशब्द काढले तर आम्ही गप्प बसणार नाही. अठरापगड, अलुतेदार-बलुतेदार, भटके, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम यांचे राजे म्हणून शिवाजी महाराज सर्वसमावेशक आहेत, असे ते म्हणाले.
या सामूहिक वाचनात बापू ओहोळ, शहाजी डोके, रजनी बागवान, संगीता भालेराव आणि उर्मिला कवडे यांनी सहभाग घेत पुस्तकाचे वाचन केले.
कार्यक्रमास सुमित भालेराव, विशाल पवार, अंकल घायतडक, अनिल सदाफुले, विकी कांबळे, सुशील राजगुरू, पप्पू भालेराव, अशोक आव्हाड, ऋषिकेश गायकवाड, रामेश्वर काळे, अश्विनी काळे, संतोष चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमातून इतिहासाच्या चिकित्सक वाचनासोबतच आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


