Crime | वैभवशाली अर्बन बँक घोटाळा 100 कोटींच्या मालमत्ता जप्त, ‘व्हाईट कॉलर’ आरोपींचा पर्दाफाश; यादी वाचा

2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ३०.३ | रयत समाचार

(Crime) वैभवशाली नगर अर्बन बँक बुडविण्यास कारणीभूत ठरलेल्या कै. चेअरमन, संचालक, वरिष्ठ अधिकारी आणि काही कर्जदारांच्या मालमत्तांवर महाराष्ट्र शासनाने मोठी कारवाई करत जप्तीची कारवाई केली आहे. या सर्व मालमत्तांची एकत्रित किंमत १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज असून, सहकार चळवळीत हा निर्णय आदर्श आणि दिशादर्शक मानला जात आहे.

(Crime) वैभवशाली इतिहास असलेल्या नगर अर्बन बँकेत संगनमताने झालेल्या भ्रष्टाचारामुळे संस्थेचा स्वनिधी आणि ठेवीदारांचे पैसे धोक्यात आले. शासन आणि रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी सूचना देऊनही संबंधित पदाधिकाऱ्यांनी सुधारणा न करता उलट भ्रष्टाचार वाढवला. २०१४ नंतर गैरव्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आणि अखेर २०२३ मध्ये बँकेचा परवाना रद्द करण्यात आला.

(Crime) या घोटाळ्यात बँकेचा जवळपास १७५ कोटी रुपयांचा स्वनिधी बुडाला असून, हजारो ठेवीदारांचे पैसे अडकले. २०१७ पासून सभासदांचे आर्थिक नुकसान झाले, तर अनेक कर्मचाऱ्यांचा रोजगारही गेला.
दरम्यान, माजी संचालक तथा बँक बचाव समितीचे प्रमुख शिलेदार राजेंद्र गांधी आणि सहकारी यांनी सातत्याने रस्त्यावरची लढाई, न्यायालयीन लढा देत ठेवीदारांना दिलासा मिळवून दिला. आतापर्यंत सुमारे ७० टक्के रक्कम परत मिळाली असून, उर्वरित ३० टक्क्यांपैकी १५ टक्के रक्कम एप्रिल २०२६ मध्ये देण्यात येणार आहे. उर्वरित रक्कमही लवकरच मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत ता.१६ मार्च २०२६ रोजी अधिसूचना जारी करून आरोपी संचालक, अधिकारी आणि काही कर्जदारांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. यामध्ये १०० कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता असल्याचा अंदाज आहे.
या कारवाईमुळे बँक बुडविणाऱ्या ‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगारांचा पर्दाफाश झाला असून, ठेवीदारांच्या पैशांची भरपाई जप्त मालमत्तेतून होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, या मालमत्ता घाईघाईने विक्री करून पुन्हा फसवणूक होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बँक बचाव समितीच्या वतीने राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, ॲड. अच्युत पिंगळे, ॲड. महेश रोडे, ॲड. मुकेश दुर्गेष्ट, डी.एम. कुलकर्णी, मनोज गुंदेचा, विलास कुलकर्णी, अवधुत कुक्कडवाल आदींनी ही माहिती दिली.Crime

आरोपींची नावे, जप्त केलेल्या मालमत्ता वाचा :


1 / 7

Download

Share This Article