पुणे | २७.३ | रयत समाचार
(Crime) पुण्यात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, धार्मिक आडोशाचा वापर करून एका भोंदू भटजीने विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. ऋषिकेश वैद्य नावाच्या भटजीने स्वतःला धार्मिक मार्गदर्शक असल्याचे भासवून पीडित हिंदू महिलेला जाळ्यात ओढले.
(Crime) मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने “मी शंकर आणि तू पार्वती” असे सांगत मंदिरात विशेष आराधना करण्याचा बहाणा केला. या धार्मिक विधीच्या नावाखाली त्याने संबंधित विवाहितेला पुण्यातील एका लॉजवर नेले. तेथे तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
(Crime) इतकेच नव्हे तर, या घटनेदरम्यान आरोपीने महिलेची अश्लील छायाचित्रे काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा वसई येथील एका हॉटेलमध्ये बोलावून अत्याचार केल्याचीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, नाशिक येथील अशोक खरात प्रकरण उघड झाल्यानंतर पीडित महिलेने धैर्य दाखवत संपूर्ण प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात असून, संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे धार्मिक आडोशाखाली सुरू असलेल्या भोंदू भटजीगिरीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला असून, समाजात संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
