Ad imageAd image

Crime | राज्यात गुन्हेगारीचा कहर : राष्ट्रवादी गुन्हेगारी टोळी? महिला आयोगाची भूमिका संशयास्पद – हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read

मुंबई | २२ मे | प्रतिनिधी

(Crime) राज्यात गुन्हेगारी घटनांनी उच्चांक गाठला असून, अनेक गंभीर प्रकरणांमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शी संबंधित व्यक्तींचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. गांधी भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी थेट प्रश्न उपस्थित केला की, “राष्ट्रवादी गुंडांची टोळी झाली आहे का? आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या टोळीचे ‘आका’ आहेत का?”

(Crime) विविध गुन्ह्यांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग? सपकाळ यांनी बीडमधील मस्साजोग घटना, पुण्याच्या ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरण, कोयता गँग, शेल्टर होम लैंगिक अत्याचारप्रकरणातील शंतनू कुकडे आणि दीपक मानकर यांचा उल्लेख केला. तसेच, वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे हे सर्वजण राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा आरोप केला.

 “या सगळ्या गुन्हेगारांचे पालकत्व सत्ताधारी घेत आहेत, त्यामुळेच त्यांना गुन्हे करण्याची हिंमत होते,” असे सपकाळ म्हणाले.
(Crime) महिला आयोगावरही टीकेची झोड. राज्य महिला आयोगाने या घटनांकडे गंभीरतेने पाहिले नसल्याचा आरोप करत सपकाळ यांनी म्हटले की, “महिला आयोग असंवेदनशील असून, अध्यक्षांना महिला सुरक्षेपेक्षा राजकारणातच रस आहे.”
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला महिला आयोगाच्या दुर्लक्षालाच जबाबदार धरत काँग्रेसने आयोगाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
धुळे लाच प्रकरण : अर्जुन खोतकर आणि पीएवर कारवाईची मागणी. धुळे दौऱ्यावर असलेल्या विधानमंडळाच्या अंदाजपत्रकीय समितीचे प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या खोलीतून जवळपास २ कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली. यामुळे महायुती सरकारच्या भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे.
“मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कारवाई न केल्यास त्यांचा पाठिंबा असल्याचे समजले जाईल,” असे सपकाळ यांनी ठामपणे सांगितले.
तसेच, शिंदे गटातील सर्व आमदारांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ईडी आणि इन्कम टॅक्स विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांचे प्रश्नही ऐरणीवर : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून, शेती आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पण सरकारकडून अद्याप पंचनामेही झालेले नाहीत, अशी टीका सपकाळ यांनी केली.
“बोगस बियाणे आणि खतांच्या लिंकिंगने शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी गटावर गंभीर आरोप : गुन्हेगारांना राजकीय अभय? वैष्णवी हगवणे प्रकरण. महिला आयोगाची भूमिका संशयास्पद. खोतकर पीएकडून २ कोटींची रोकड : ईडी चौकशीची मागणी. शेतकऱ्यांच्या अडचणी, बोगस बियाण्यांचा सुळसुळाट.Crime

हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading