प्रासंगिक | २४.४ | मेल्सीना तुस्कानो- परेरा
(Social) जेव्हा परप्रांतीय व्यक्ती महाराष्ट्रात येऊन वर्षानुवर्षे राहतात, रोजगार करतात; पण ज्या मातीत राहिले आहेत, त्या मातीतले होत नाहीत, मग काय फायदा महाराष्ट्रात येऊन?
(Social) सध्या सुरू असलेल्या रिक्षा संपाच्या पार्श्वभूमीवर बोलायचे झाले, तर अनेक रिक्षाचालकांची मनमानी ही सर्वसामान्यांच्या त्रासाचे मुख्य कारण बनली आहे. काही विचारले किंवा सांगितले, तर आवाज चढवून बोलणे ही जणू सवयच झाली आहे.
(Social) नालासोपारा, विरार, वसई परिसरात तर एका रिक्षामध्ये प्रवाशांना कोंबून बसवले जाते; अन्यथा रिक्षा सोडली जात नाही. भाड्याच्या बाबतीतही काटेकोरपणा इतका की, एक रुपयाही सोडला जात नाही, सुट्टे नसतील तर रिक्षा थांबवून तो एक रुपया घेऊनच पुढे जातात.
वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबतही गंभीर प्रश्न निर्माण होतात. रस्त्यावर वाहन चालवण्याची शिस्त अनेकांकडे दिसून येत नाही आणि त्यामुळे वाहतूक कोंडी वाढते. आणि आता हीच मंडळी “मराठी बोलणार नाही” अशी भूमिका घेत असल्याचे दिसते, हे अधिकच चिंताजनक आहे.
ही लोकं महाराष्ट्रात येऊन स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कमावत आहेत. मग त्याच पोटासाठी मराठी भाषा शिकण्यास इतकी आढी का? हा माज नेमका कुठून येतो, हा प्रश्न उपस्थित होतो.
महाराष्ट्र शासनाने यावर ठोस उपाययोजना का करू नयेत? भूमिपुत्रांना आणि मराठी माणसांना होत असलेला त्रास त्यांनाच माहीत आहे; मात्र त्याकडे लक्ष देणारे कोणीच दिसत नाही. परप्रांतीयांची वाढती संख्या आणि त्यातून वाढणारी मनमानी यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
अन्यथा, मराठी माणूस केवळ त्यांच्या शिव्या आणि मनमानी सहन करत राहील आणि ही परिस्थिती अधिक गंभीर होत जाईल.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
