पुणे | २२.३ | रयत समाचार
येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर केला. हा निकाल परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.
परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण झाल्याची माहिती भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
उमेदवारांकडून मुदतवाढीची मागणी झाल्याने आता ही माहिती ता.२२ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ऑनलाईन भरता येणार आहे. संबंधित माहिती भरण्यासाठी https://mscepune.in/dtedola/KP2026Info.aspx ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
परिषदेने उमेदवारांना दिलेल्या मुदतीत आवश्यक माहिती भरण्याचे आवाहन केले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
