समाजसंवाद | ३१ जुलै | संजीव चांदोरकर
(Education) एमआयटी या अमेरिकेतील विश्वविद्यालयाने चॅट जीपीटी/ ChatGPT वापरणाऱ्या आणि न वापरणाऱ्यांचा तुलनात्मक अभ्यास केला. चॅट जीपीटी वापरणाऱ्यांपैकी ८३ टक्के लोकांना फक्त काही मिनिटापूर्वी चॅट जीपीटी वापरून लिहिलेल्या मजकुरातील एक वाक्य देखील आठवत नव्हते. त्यांची ब्रेन कनेक्टिव्हिटी खूप कमी झाली होती.
(Education) चॅट जीपीटी वापरणाऱ्यांचा कामाचा वेग ६० टक्क्यांनी वाढला होता. पण पण मेंदूची नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता खूप कमी झाली होती. चॅट जीपीटी तुम्हाला प्रश्नांची उत्तरे पटापट देऊ शकते. पण तुम्ही विचारक्षमता गमावून बसू शकता.
(Education) चॅट जीपीटी किंवा तत्सम तंत्रज्ञान सहाय्यक म्हणून वापरा पण तुमच्या मेंदूला पर्याय म्हणून त्याच्याकडे बघू नका.
