Art | संदेश भंडारे यांच्या ‘उजेडाच्या वाटेवर’ छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; स्त्रीजीवनातील वास्तवाचे प्रभावी दर्शन

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | ६.३ | गुरूदत्त वाकदेकर

(Art) आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांचे ‘उजेडाच्या वाटेवर’ हे छायाचित्र प्रदर्शन मुंबईत मोठ्या उत्साहात सुरू झाले असून, रसिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्त्रीजीवनातील विविध पैलू, संघर्ष, जिद्द आणि समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रभावीपणे मांडणाऱ्या या छायाचित्रांनी पाहणाऱ्यांना विचार करायला भाग पाडले आहे.

(Art) महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित हे प्रदर्शन प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरातील कलादालनात भरविण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन ४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले असून ५ मार्चपासून ते ८ मार्चपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले.

(Art) प्रदर्शनात स्त्रीजीवनातील अनेक वास्तवदर्शी प्रसंग छायाचित्रांमधून मांडण्यात आले आहेत. ग्रामीण व शहरी जीवनातील स्त्रियांची भूमिका, त्यांचे संघर्ष, सामाजिक परिस्थिती आणि त्यांच्या आयुष्यातील आशेचे किरण या विषयांना छायाचित्रांद्वारे प्रभावी अभिव्यक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे कला रसिक, विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देत आहेत.Art

दरम्यान, महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रदर्शनामुळे स्त्रीविषयक संवेदनशीलता वाढविणे आणि समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हा महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे.

हे छायाचित्र प्रदर्शन दररोज सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले असून ८ मार्चपर्यंत सर्वांना भेट देता येणार आहे. त्यामुळे कला रसिकांनी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी केले.

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading