मुंबई | १७.२ | रयत समाचार
(Women) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा अजित पवार (Sunetra Pawar) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत ही अधिकृत घोषणा केली.
(Women) या बैठकीला पक्षातील सर्व आमदार उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्या नावाला सर्व आमदारांनी एकमुखी समर्थन दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पक्षातील नेतृत्वबदलावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
(Women) विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या २६ फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर औपचारिक मंजुरी देण्यात येणार असून त्यानंतर अधिकृत घोषणा केली जाईल.
पक्षातील संघटनात्मक बदल आणि आगामी राजकीय रणनीतीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. राज्याच्या राजकारणात या घडामोडींचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
