नवी दिल्ली | ३० जुलै | प्रतिनिधी
(Rip news) लक्षद्वीपचे माजी खासदार डॉ. पी. पुकुन्ही कोया यांचे निधन झाले असून त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, कर्तृत्ववान आणि संवेदनशील संसदपटू हरपला आहे.
(Rip news) डॉ. कोया यांनी संसदेमध्ये लक्षद्वीपच्या जनतेच्या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिले. विशेषतः शैक्षणिक समस्या आणि संधी या विषयांना त्यांनी नेहमी आवाज दिला. त्यांच्या नेतृत्वामुळे लक्षद्वीपच्या प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळाले.
(Rip news) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करत लिहिले, लक्षद्वीपचे माजी खासदार व माझे जुने सहकारी डॉ.पी. पुकुन्ही कोया ह्यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे. डॉ. कोया ह्यांनी संसदेत प्रतिनिधित्व करताना नेहमी लक्षद्वीपच्या शैक्षणिक प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवलं. लक्षद्वीपचे प्रश्न मुख्य प्रवाहात आणणाऱ्या नेतृत्वांमध्ये त्याचं योगदान महत्त्वाचं आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना आणि डॉ. कोयांना भावपूर्ण श्रद्धांजली.
