सांगली | १५ एप्रिल | प्रतिनिधी
(Cultural Politics) ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली. सांगली शहरात सोमवारी रात्री एका कार्यकर्त्यांच्या घरी जेवण करून परतत असताना गल्लीत कुत्र्याने हल्ला केला. यामध्ये भिडे जखमी झाले असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
(Cultural Politics) रायगडावरील अनैतिहासिक ‘वाघ्या कुत्रा’ हटवावा अशी मागणी शिवरायांचे वंशज छत्रपती युवराज संभाजी यांनी केली होती, त्यास संभाजी भिडे यांनी विरोध केला होता. त्यावेळी भिडे म्हणाले होते, वाघ्या कुत्र्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतली ही कथा सत्य आहे. त्यामुळेच त्याचं स्मारक उभारण्यात आलं आहे. माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात. देशाशी आपल्याला एकनिष्ठ रहायचं आहे याचं द्योतक म्हणून ते स्मारक हवंच. वाघ्या कुत्र्याच्या नावावर जे चाललं आहे आणि कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले जे बोलत आहेत ते १०० टक्के चूक आहे. ती कुत्र्याने उडी घेतली ही कथा सत्य आहे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.